मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कॉँग्रेसला बसणार दणका, माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर


विशेष प्रतिनिधी

मुंबई: महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कॉँग्रेसला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. निरुपम यांचा उत्तर भारतीय मतांवर मोठा प्रभाव आहे. त्याचा भाजपाला फायदा होणार आहे. Former MP Sanjay Nirupam on BJP’s way

संजय निरुपम हे गेल्या अनेक दिवसांपासून कॉँग्रेसवर नाराज आहेत. मुंबई कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यामुळे ते नाराज आहेत. त्याचबरोबर कॉँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यामुळेही त्यांनी संताप व्यक्त केला होता.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले निरुपम भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांविरोधात आक्रमक होण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.

संजय निरुपम यांनी पुढे ‘दोपहर का सामना’ या शिवसेनेच्या हिंदी भाषिक मुखपत्राचे संपादक पद सांभाळले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘आशीवार्दाने’ त्यांनी राज्यसभेत शिवसेना खासदार म्हणून प्रवेश केला. पण काही वर्षांतच शिवसेना नेतृत्वावर नाराज झालेल्या निरुपम यांनी काँग्रेसची वाट धरली.



काँग्रेसच्या तिकिटावर निरुपम उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. ते २००९ ते २०१४ या काळात उत्तर मुंबईचे खासदार होते.

२०१४ तसेच २०१९ च्या खासदारकीच्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव झाला. लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ आणि २०१९ मध्ये मुंबईत काँग्रेसला एकही जागा जिंकता आला नाही. निरुपम २०१९ मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यामुळे अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला. यानंतर हळू हळू निरुपम मागे पडले. पण भाजप मुंबई महापालिका तसेच भविष्यातल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी इच्छुक आहे. याकरिता अधिकाधिक उत्तर भारतीय मते आकर्षित करण्यासाठी कृपाशंकर सिंह यांच्या पाठोपाठ भाजप संजय निरुपम यांना पक्षात प्रवेश देण्याच्या तयारीत आहे.

निरुपम हे मूळचे बिहारचे आहेत. मुंबई-ठाण्यातील उत्तर भारतीय, प्रामुख्याने बिहारी जनतेमध्ये त्यांच्या शब्दाला मान देणारे आहेत. मुंबईच्या प्रश्नांची निरुपम यांना जाण आहे. यामुळेच भाजप निरुपम यांना पक्षात प्रवेश देण्याचा विचार करत आहे.

Former MP Sanjay Nirupam on BJP’s way

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात