लस पुरवठादारांची मुंबईला अधिक पसंती : परदेशी कंपन्यांचा पंजाब, दिल्लीला नकार


वृत्तसंस्था

मुंबई : परदेशी कंपन्यांनी दिल्ली, पंजाबपेक्षा मुंबईला लसपुरवठा करण्यासाठी अधिक पसंती दाखवली आहे. त्यामुळे परदेशी लशी उपलब्ध होण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. Foreign Companies Supply Vaccines To Mumbai Municipal Corporation

स्पुटनिक लशीबरोबरच अ‍ॅस्ट्राझेनेका-फायझर आदी कंपन्यानी मुंबई पालिकेला पुरवठा करण्याची तयारी आठ पुरवठादारांनी दर्शवली आहे. नव्याने स्वारस्यपत्र सादर केलेल्या काही कंपन्यांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून, त्यासाठी पालिकेने निविदेला १ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.



कोरोना प्रतिबंधक लशींच्या एक कोटी डोससाठी मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावरील पुरवठादारांकडून स्वारस्यपत्र मागवले होते. १८ मेपर्यंतच्या मुदतीत पाच लसपुरवठादारांनी स्वारस्यपत्र दाखल केले होते. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालिकेने निविदेला आठवडाभराची मुदतवाढ दिली. त्याची मुदत मंगळवारी संपल्याने या निविदेकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

मंगळवापर्यंत आणखी तीन लसपुरवठादारांनी स्वारस्य दर्शवले. मात्र, त्यांच्याही कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक असल्यामुळे या प्रक्रियेसाठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
मंगळवारी आणखी चार इच्छुक पुरवठादारांशी चर्चा करण्यात आली.

Foreign Companies Supply Vaccines To Mumbai Municipal Corporation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात