मराठा आरक्षणासाठी आता दंडुका मोर्चा

विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खरेच बाळासाहेबांचे पुत्र असतील तर ते उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, असे करतील , मराठा आरक्षण आणि नामांतरासह विविध मागण्यासाठी क्रांतीदिनापासून दंडुके आंदोलन करणार, असे छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी सांगितले. For Maratha Reservation Now Danduka Morcha

मराठा आरक्षणासाठी केंद्रासोबत भांडायचे का ? , की राष्ट्रपतीसोबत का न्यायालयासोबत हे राज्य सरकारने ठरवावे. मात्र, आम्हाला आरक्षण द्याव तसेच खरेच स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र असाल तर उस्मानाबादचे नाव तात्काळ धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर, अशी नामांतरे करा अन्यथा ९ अॅगस्टपासून आता मूक मोर्चे नाही तर दंडुके मोर्चे काढू .मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना वठणीवर आणू, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला असून थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

  • स्व. बाळासाहेबांचे सुपुत्र असाल नामांतर करा
  • उस्मानाबादचे धाराशिव, औरंगाबादचे संभाजीनगर
  • नामांतरे करा अन्यथा ९ अॅगस्टपासून दंडुके मोर्चे
  • मराठा आरक्षणासाठी आता दंडुके मोर्चे काढणार
  • आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना वठणीवर आणणार
  • मुख्यमंत्री ठाकरे यांना छावा संघटनेचे चे थेट आव्हान

For Maratha Reservation Now Danduka Morcha

महत्त्वाच्या बातम्या