Flexi Fuel ! फ्लेक्सी फ्युएल वाहनं बाजारपेठेत उपलब्ध कऱण्याचे नितीन गडकरींचे आदेश ; जाणून घ्या काय असतं फ्लेक्सी फ्युएल ?


एलएनजी, सीएनजी आणि इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनांचा अधिक वापर केल्यास पेट्रोलच्या वाढत्या किमतींपासून आराम मिळेल.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील देशातील पहिल्या व्यावसायिक लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) फिलिंग स्टेशनचे उद्घाटन केले.  Flexi Fuel! Nitin Gadkari orders to make flexi fuel vehicles available in the market; Find out what is Flexi Fuel?

पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे दर गगनाला भिडले आहेत. तसंच या इंधन वापरामुळे होणारं प्रदूषणही वाढलं आहे. अशात भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि बायोडिझेल मिश्रित डिझेल वापरात वाढ करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. त्या दिशेने एक पाऊल म्हणून नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना फ्लेक्सी फ्युएल वाहनं बाजारपेठेत उपलब्ध कऱण्याचे आदेश दिले आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आणि ऑटोमोबाईल कंपन्यांच्या सीईओशी संवाद साधत असताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

फ्लेक्सी फ्युएल शब्द फ्लेक्सिबल फ्युएल या शब्दावरून आला आहे. या इंधनावर चालणारी वाहनं दोन किंवा अधिक प्रकारच्या इंधन मिश्रणावरही सहजपणे चालू शकतात. इंधनाच्या बाबतीत ही लवचिकता असल्याने या वाहनांना फ्लेक्सिबल फ्युएल वाहनं असं म्हणतात.



सध्या आपल्या वाहनांमध्ये जे पेट्रोल वापरलं जातं त्यात जास्तीत जास्त 8.5 टक्के इथेनॉलचं मिश्रण केलेलं असतं. 2030 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत आणि बायोडिझेलचं प्रमाण हे पाच टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवलं आहे. त्या दृष्टीने आता फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिलं जातं आहे.

फ्लेक्स इंजिन असणारी वाहनं ब्राझिल, अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये आहेत. या फ्लेक्स वाहनांच्या इंजिनमधे इंधन मिश्रण सेन्सर असतो. त्यामुळे जसं मिश्रण आहे त्या प्रमाणत ही कार चालवण्यायोग्य असते. इथेनॉल, मिथेनॉल , गॅसोलीन या सगळ्यांपासून हे फ्लेक्सि फ्युएल तयार होतं. फ्लेक्स फ्युएल वाहनं तयार झाल्यावर त्यांच्या इंधनाच्या एकाच टाकीत पेट्रोल आणि इथेनॉल अशा दोन्हींचं मिश्रण अगदी 50 टक्क्यांपर्यंत (किंवा इंजिनाच्या क्षमतेनुसार त्याहून जास्त) वापरलं तरी इंजिन चालू शकेल. कारण ते इंजिन तशाच प्रकारच्या इंधनावर चालण्यासाठी उत्पादित केलेलं असेल. अशी वाहनं बाजारपेठेत आली, की पेट्रोल पंपावर इथेनॉलचं मिश्रण जास्त प्रमाणात असलेलं इंधनही स्वतंत्रपणे मिळू शकेल. आता या प्रकराची वाहनं आणा आणि पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना पर्याय निर्माण करा असे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

Flexi Fuel! Nitin Gadkari orders to make flexi fuel vehicles available in the market; Find out what is Flexi Fuel?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात