Kripashankar Singh Joining BJP : राज्यात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला आहे. आता मुंबईतील उत्तर भारतीय मतदार ज्यांच्या मागे उभा आहे असे राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तथा काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह बुधवारी 7 जुलै भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिका निवडणुकांचे समीकरण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. Ex Minister Congress Leader Kripashankar Singh Joining BJP Tomorrow Ahead Of BMC Elections
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला आहे. आता मुंबईतील उत्तर भारतीय मतदार ज्यांच्या मागे उभा आहे असे राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तथा काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह बुधवारी 7 जुलै भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिका निवडणुकांचे समीकरण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
कृपाशंकर सिंह काही काळापूर्वी बेहिशेबी मालमत्ता आणि काडतुसंप्रकरणी अडचणीत आले होते. सक्रिय राजकारणापासून तेव्हापासून वेगळेच राहिले. जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर उघडपणे त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसच्या भूमिकेचा निषध म्हणून त्यांनी सोनिया गांधींकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर मात्र ते कोणत्याही पक्षात न जाता ते दूरच राहिले. मध्यंतरी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपतीलाही जायचे. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे मोठे महत्त्व आहे. मुंबईत तब्बल 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार असल्याचे सांगितले जाते. ही मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. अनेक मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीयांची मतेच उमेदवारांचे भवितव्य ठरवतात. कृपाशंकर सिंह यांच्या मागे उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका निवडणुकांतील चित्र बदलू शकतं, असा कयास लावला जात आहे.
Ex-Minister Congress Leader Kripashankar Singh Joining BJP Tomorrow Ahead Of BMC Elections
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App