कार्यक्रमादरम्यान ‘टरबूज’ म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसे यांनी दिले ‘हे’ उत्तर


विशेष प्रतिनिधी

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वैर सर्वांना ठाऊक आहेच. एकनाथ खडसे यांनी जेव्हा भाजप पक्ष सोडला होता तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरेच गंभीर आरोप केले होते. त्यांनी असेही म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी भाजप सोडत आहे.

Eknath Khadse gave impromptu reply to people calling Watermelon

जळगावमधील मुक्ताईनगरमधील जोंधळ खेडा धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात बोलताना मात्र एकनाथ खडसे यांची जीभ पुन्हा एकदा घसरलीच. एकनाथ खडसे पत्रकारांशी संवाद साधत असताना तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी टरबूज असा आवाज देण्यास सुरूवात केली. यावर अतिशय शांतपणे एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, आज जेव्हा घरी जाल तेव्हा एक काम पहिल्यांदा करा, इंटरनेट ओपन करा, गुगलवर जा आणि ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण’ असा प्रश्न टाका. उत्तर तुमचे तुम्हाला मिळून जाईल.


तोंड दाबून बुक्यांचा मार खाणाऱ्या शिवसेना आमदारांची सहनशक्ती संपली, छगन भुजबळांपाठोपाठ एकनाथ खडसेंवरील रागही अखेर आला बाहेर


गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की जामनेर वाल्यांचं ऐकून माझ्या मागे ईडी लावली गेली. नाथाभाऊंच्या मागे इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लावायचं. घरी दोन वेळा इन्कम टॅक्समध्ये येऊन गेले. परत एकदा धाड टाकली होती. मी फार्महाऊसवर राहात असल्याने तुम्हाला माहीत नाही. लाचलुचपत विभागाने तपास केला असून कोणताही चुकीचा व्यवहार झालेला नाही. न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला असून कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे . अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Eknath Khadse gave impromptu reply to people calling Watermelon

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण