मुलगा व्हावा म्हणून पत्नीचा आठ वेळा गर्भपात, स्टेरॉईडसची दीड हजार इंजेक्शन, निवृत्त न्यायाधिशांच्या मुलीने केली पोलीसांत तक्रार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुलगाच व्हावा या विकृत मानसिकतेतून एका महिलेचा आठ वेळा गर्भपात करण्यात आला. तिला दीड हजार इंजेक्शन देण्यात आली. तरीही मुलगा झाला नाही म्हणून सातत्याने मारहाण झाल्याचा प्रकार एका निवृत्त न्यायाधिशाच्या मुलीबाबत घडल आहे. विशेष म्हणजे दादर येथील अत्यंत उच्चभ्रु कुटुंबात हा प्रकार घडला आहे.Eight abortions of wife for childbirth, 1,500 injections of steroids, daughter of retired judge lodges complaint with police

उच्चशिक्षित, श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब बघून, निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी थाटामाटात मुलीचा विवाह करुन दिला. मात्र, वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा या हव्यासापोटी पतीने या निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीचा परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सासरच्यांनी घराबाहेर काढल्यानंतर, मुलीने दादर पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी या प्रकरणी वकील कुटुंबाविरुद्ध गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यासह हुंड्यासाठी छळ व अन्य कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.



प्रभादेवी परिसरात राहणाºया आई-वडिलांसोबत ४० वर्षीय तक्रारदार महिला राहतात. वकिली क्षेत्रातील प्रतिष्ठित मुलासोबत २००७ मध्ये विवाह लावून दिला. सोबत ६२ तोळे सोन्याचे दागिनेही दिले. पती व सासू, सासरे वकील, तर नणंद डॉक्टर आहे. महिन्याला ७ ते ८ लाख उत्पन्न आहे. मला माझा वंश व मालमत्ता जपण्यासाठी मुलगा हवाय म्हणत पतीने मारहाण सुरू केली.

पहिल्यांदा मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरांकडे मुलगा होण्यासाठी उपचार घेतले. पतीने प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (जन्मापूर्वी लिंग तपासणीसाठी बीजाची अंमलबजावणी) या टेस्टसाठी बँकॉकमध्ये नेले. तेथे ८ वेळा गर्भ धारणेच्या आधी एम्ब्रियोच्या लिंगाची (बीजाची) परीक्षा करून उपचार व शस्त्रक्रिया करीत होते. यासाठी जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त हार्मोनल व स्टिरॉइड इन्जेक्शन देण्यात आली होती. भारतामध्ये बंदी असलेल्या ट्रीटमेंटसाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास ८ वेळा ही ट्रीटमेंट करून गर्भपात केला.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या काही दिवसांतच पतीकडून छळ सुरू झाला. सासू आणि पतीने संयुक्त खाते उघडून खात्यातील ३४ लाख रुपये त्यांच्या खात्यात वळते केले. घरात मोलकरीण बनविले. २००९ मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर अत्याचारात वाढ झाली. २०११ मध्ये पुन्हा गर्भवती राहिल्याने पतीने डॉक्टराकडे नेले आणि मूल नको असल्याचे सांगत गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले.

२०१५ मध्ये पुन्हा मारहाण झाली. यात ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने तिने घर सोडले. मुलीच्या वाढदिवसासाठी १० रुपयांचे चॉकलेट घेतले नाही. मात्र, न जन्मलेल्या वंशाच्या दिव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

Eight abortions of wife for childbirth, 1,500 injections of steroids, daughter of retired judge lodges complaint with police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात