प्रतिनिधी
मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कारवायांना वेग आला असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कारखान्यावर इन्कम टॅक्सचे छापे सुरू आहेत. नवाब मलिक कोठडीत आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची 13.50 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ED – Income tax proceedings expedited
या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप आक्रमक होऊन राज्य सरकारला अडचणीत आणत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्वाची बैठक आज संध्याकाळी होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर शरद पवार चर्चा करणार आहेत.
राष्ट्रवादीचे बैठक संध्याकाळी 5.30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App