विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केले. Don’t make any statement that Maharashtra will burn; Statement by Jitendra Awhad
ते म्हणाले, महाराष्ट्र शांत आहे.कुठेही क्लेश नाही. द्वेष दिसत नाही.सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागले आहे. त्यांच्या खिशात पैसे नाहीत. गॅस महाग झाला. पेट्रोल – डिझेल महागले. भाज्या, केरोसिन महाग झाले.खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झाले. याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचे नाही ते इश्यू बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे.
गॅसबद्दल, पेट्रोल – डिझेल महागाई याबद्दल बोला. ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला. श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ‘मनसे’ चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर काढून टाकण्याबाबत वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बहुल मतदारसंघातून निवडून येणारे आव्हाड बोलत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App