दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपतींना लिहिलं पत्र, म्हणाले- न्याय मिळाला नाही, तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही!


दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणेंसह इतरांवर कारवाईची मागणी केली आहे.Disha Salian’s parents wrote a letter to the President, saying – if justice is not done, there is no alternative but suicide!


वृत्तसंस्था

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणेंसह इतरांवर कारवाईची मागणी केली आहे.

आत्महत्येशिवाय पर्याय नाही

दिशाचे वडील सतीश सालियन आणि आई वासंती यांनी त्यांना न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. सतीश आणि वासंती सालियन यांनी बुधवारी राष्ट्रपतींना पत्र लिहून भाजप नेते राणे आणि त्यांच्या मुलाकडून होणारा छळ थांबवण्याची विनंती केली. राणे आणि त्यांचा मुलगा नितेश यांच्यावर दिशाबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणे आणि खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुशांतच्या मृत्यूशी जोडले

पत्रात राष्ट्रपतींना कळवण्यात आले आहे की, त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही लोकांनी या घटनेचा (तिची कथित आत्महत्या) राजपूतच्या मृत्यूशी संबंध जोडण्यास सुरुवात केली होती आणि वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर हे सर्व माहिती पसरवण्यास सुरुवात झाली. नारायण राणे आणि नितेश राणे यांसारख्या काही नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्याशी वैयक्तिक वैमनस्य असल्यामुळे या मुद्द्यावर हस्तक्षेप केला आणि आम्हाला त्यांच्या राजकीय लढाईत ओढून आमचे जीवन दयनीय केले, असे या पत्रात म्हटले आहे.

सुशांत-दिशाच्या मृत्यूत 6 दिवसांचे अंतर

28 वर्षीय दिशा सालियन हिने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सहा दिवसांनंतर, 34 वर्षीय सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर अनेकांनी या दोघांवर खूप चर्चा केली, तर सोशल मीडियावरही या दोघांबद्दलच्या अनेक थिअरी समोर आल्या होत्या.

Disha Salian’s parents wrote a letter to the President, saying – if justice is not done, there is no alternative but suicide!

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण