MAHABHARATA :आज दणाणली सभा …सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी ?कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं-पांडवांनी नाही …
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज विधानसभेत महाराष्ट्राचं महाभारत पहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना शल्या सारखे टोमणे मारून घायाळ करण्याचा प्रयत्न केला मात्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर देताना महाभारताचा धडा अन् नैतिकतेचा पाढा विधानसभेत ऐकवला.फडणवीस आज आक्रमक होते. कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं. पांडवांनी नाही. पण कपटाने राज्य घेतल्यानंतरही अर्जुन घाबरला नाही. आम्हीही घाबरत नाही.’MAHABHARATA
मला हे सांगा की, मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी ही अवलाद नाही. समोर लढणारे लोकं आहोत आम्ही. कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं. पांडवांनी नाही. पण कपटाने राज्य घेतल्यानंतरही अर्जुन घाबरला नाही. आम्हीही घाबरत नाही.’
काय बोलले फडणवीस …MAHABHARATA
राज पर पेहरा है, जख्म बहौत गहरा है.. लगता है बडी चोट खायी है, दर्द बनके बाते जबानपर आयी है’ पण
‘या ठिकाणी शिखंडीचा देखील उल्लेख झाला. पण मला हे सांगा की, मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी ही अवलाद नाही. समोर लढणारे लोकं आहोत आम्ही.’ अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं.
‘जे विषय मी मांडले त्यातल्या कुठल्याच विषयावर या ठिकाणी उत्तर आलं नाही. यशवंत जाधवांनी 24 महिन्यात 36 प्रॉपर्टी कशा कमवल्या याचं उत्तर आलं नाही. 29 कोटीच्या टॅब खरेदीचं उत्तर नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याचं उत्तर देण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त टोमणे लगावले. त्यांच्याकडे टोमणे बॉम्ब आहेत.’
‘माझा एकच सवाल आहे. नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडनं जमीन खरेदी करणं त्याच्यासोबत सह्या करणं जो जेलमध्ये आहे, बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. अशा आरोपीकडून खोट्या कागदपत्रांवर.. याचं तरी समर्थन कसं केलं जाऊ शकतं.’
‘मला दु:ख आहे. ते काही समर्थन करतील. पण इतके वर्ष त्यांच्यासोबत राहिल्यानंतर अशा गोष्टीचं समर्थन हे त्या ठिकाणी करतात. याचं मला खरोखर अतिशय दु:ख आहे.’
खरं म्हणजे तुम्ही म्हणता आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर टीका करु नका. कोण करतंय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मनात हा जो संभ्रम आहे ना तो काढून टाका, की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App