प्रतिनिधी
पुणे : प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्प आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पुणे येथील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते. Marxist thinker, writer Sudhir Bedekar dies
मार्क्सवादी विचारांशी त्यांचा पहिला परिचय त्यांचे वडील आणि प्रसिद्ध विचारवंत समीक्षक दि. के. बेडेकर यांच्यामुळे झाला. मुंबई आय. आय. टी. चे बी. टेक असलेल्या सुधीर बेडेकर यांनी अत्यल्प काळ केलेली नोकरी वगळता, त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक प्रबोधन कार्य व डावी चळवळ यासाठी वाहिले होते.
त्यांच्यासारख्याच अनेक अस्वस्थ लेखक, चित्रकार आणि अनेक कनिष्ठ व मध्यमवर्गीय युवक-युवती व विद्यार्थी यांच्यासह त्यांनी महाराष्ट्रात मार्क्सवादाचा नव्या पद्धतीने विचार करणारा ‘भागोवा’ हा राजकीय वैचारिक गट स्थापन केला. १९७० च्या दशकात जगभरात आणि भारतात अस्वस्थ व बंडखोर युवकाचे उठाव होत होते.
महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकामधील ‘भागोवा’ गटाचे एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते पुढे आले. एक नवी वाट चोखाळणारे आणि सांस्कृतिक व सर्जनशील मानुष अशा पद्धतीने मार्क्सवादाची मांडणी करणारे विचारवंत म्हणून सुधीर बेडेकर सत्तरीच्या दशकात महाराष्ट्राला परिचित झाले. याच काळात शहादा (धुळे) येथे ‘श्रमिक संघटनेच्या माध्यमातून उभ्या झालेल्या आदिवासी शेतकरी शेतमजुरांच्या चळवळीशी ‘मागोवा’ व सुधीर बेडेकर अत्यंत क्रियाशील व जैव रीतीने जोडले गेले.
‘हजार हातांचा ऑक्टोपस’, ‘विज्ञान कला आणि क्रांती’ या पुस्तकांचे तसेच डाव्या विचाराचे प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे ते लेखक होते. ‘मागोवा प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके व पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या. प्रचलित सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचे मार्क्सवादी दृष्टिकोनातून परखड विश्लेषण करणारे आणि क्रांतीकारी राजकीय वैचारिक मांडणी करणारे शेकडो लेख त्यांनी लिहिले. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना ते प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App