योगी सरकारचे मंत्रिमंडळ : 52 मंत्र्यांपैकी सर्वात जास्त 18 मंत्री ओबीसी; 10 ठाकूर, 8 ब्राह्मण, 7 दलित, 3 जाट आमदारांना मिळाली संधी


योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी सोहळा काल पार पडला. 37 वर्षांनी ऐतिहासिक विक्रम रचत उत्तर प्रदेशात योगींनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रिपदाची देण्यात आली. दरम्यान योगींच्या मंत्रिमंडळाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या मंत्रिमंडळात सामाजिक समतोलासाठी सर्व स्तरांतून प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.Yogi governments cabinet Minister Full List, 18 out of 52 ministers are OBCs; 10 Thakurs, 8 Brahmins, 7 Dalits, 3 Jat MLAs got the opportunity


वृत्तसंस्था

लखनऊ : योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी सोहळा काल पार पडला. 37 वर्षांनी ऐतिहासिक विक्रम रचत उत्तर प्रदेशात योगींनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रिपदाची देण्यात आली. दरम्यान योगींच्या मंत्रिमंडळाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या मंत्रिमंडळात सामाजिक समतोलासाठी सर्व स्तरांतून प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुका समोर ठेवूनच यूपीत हे नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आहे, अशी चर्चा सुरू आहे. याशिवाय मोदी सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळाप्रमाणेच योगी सरकारच्या मंत्रिमंडळातही उच्च विद्याविभूषित, माजी नोकरशहांनाही मानाचे पान वाढण्यात आले आहे.



मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या शपथेनंतर 50 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 52 सदस्यीय मंत्रिमंडळात 16 कॅबिनेट मंत्री, 14 स्वतंत्र प्रभार आणि 20 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, श्रीकांत शर्मा, सतीश महाना, मोहसीन रझा आणि मागील सरकारमधील २० मंत्र्यांना या सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही.

या शपथविधी सोहळ्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल स्टेडियमवर पोहोचले होते. पंतप्रधान स्टेडियमवर पोहोचल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत शपथविधीला सुरुवात झाली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक आमदारांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. मंत्रिमंडळात सर्वाधिक 18 ओबीसी, 10 ठाकूर, 8 ब्राह्मण, 7 दलित, 3 जाट, 3 बनिया, दोन पंजाबी आणि एक मुस्लिम चेहरा आहे.

असे आहे नवे मंत्रिमंडळ

योगी आदित्यनाथ- मुख्यमंत्री
केशव मौर्य- उपमुख्यमंत्री
ब्रजेश पाठक- उपमुख्यमंत्री
सूर्य प्रताप शाही- मंत्री
सुरेश खन्ना- मंत्री
स्वतंत्रदेव सिंह- मंत्री
बेबी रानी मौर्य-मंत्री
लक्ष्मी नारायण चौधरी- मंत्री
जयवीर सिंह- मंत्री
धर्मपाल सिंह- मंत्री
नंद गोपाल नंदी- मंत्री
भूपेंद्र चौधरी- मंत्री
अनिल राजभर- मंत्री
जितिन प्रसाद- मंत्री
एके शर्मा- मंत्री
योगेंद्र उपाध्याय- मंत्री
राकेश सचान- मंत्री
आशीष पटेल- मंत्री
संजय निषाद- मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

नितीन अग्रवाल
कपिलदेव अग्रवाल
रवींद्र जायसवाल
संदीप सिंह
गुलाब देवी
गिरीश यादव
धर्मवीर प्रजापति
असीम अरुण
जेसीएस राठौर
दयाशंकर सिंह
नरेंद्र कश्यप
अरुण सक्सेना
दिनेश सिंह
दयाशंकर मिश्र

राज्यमंत्री झालेले 20 आमदार पुढीलप्रमाणे…

मयंकेश्वर सिंह
दिनेश खटिक
संजीव गौड
बलदेव औलख
अजीत पाल
जसवंत सैनी
रामकेश निषाद
मनोहर लाल मन्नू कोरी
संजय गंगवार
बृजेश सिंह
केपी मलिक
सुरेश राही
सोमेंद्र तोमर
अनूप प्रधान
प्रतिभा शुक्ला
राकेश राठोड गुरू
रजनी तिवारी
सतीश शर्मा
दानिश आझाद अन्सारी
विजय लक्ष्मी गौतम

Yogi governments cabinet Minister Full List, 18 out of 52 ministers are OBCs; 10 Thakurs, 8 Brahmins, 7 Dalits, 3 Jat MLAs got the opportunity

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात