बीटकाॅईन गुन्हयातील दाेन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडी


बीटकाॅईन फसवणुक गुन्हयात पुणे सायबर गुन्हे शाखेने अटक केलेले आराेपी माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घाेडे यांची पाेलीस काेठडीची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.


 प्रतिनिधी 

पुणे – बीटकाॅईन फसवणुक गुन्हयात पुणे सायबर गुन्हे शाखेने अटक केलेले आराेपी माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घाेडे यांची पाेलीस काेठडीची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पाेलीसांनी सदर आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी देण्याची मागणी केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांनी आराेपींना न्यायालयीन काेठडी मंजूर केली आहे.BITCOIN Fraud case two accused now Magistrate custody JMFC court order

आराेपींना न्यायालयीन काेठडी मंजूर करताच रविंद्र पाटील याच्या वकीलांना जामीनाकरिता न्यायालयात अर्ज सादर केला आहे. तर पाटील याची पत्नी कांचन पाटील आणि भाऊ अमरनाथ पाटील यांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला असून याबाबत न्यायालयात साेमवारी सुनावणी हाेणार आहे.



 

रविंद्र पाटील याच्याकडे केलेल्या तपासात त्याने माेठया प्रमाणात क्रिप्टाे करन्सी स्वत:चे व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वाॅलेटवर घेतले असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे सहा काेटी रुपये किंमतीचे विविध क्रिप्टाे करन्सी जप्त करण्यात आले आहे. तसेच आणखी क्रिप्टाे करन्सी हस्तगत करण्याचे पाेलीसांचे प्रयत्न सुरु आहे.

आराेपींनी अपहार केलेल्या रक्कमेचा. मालमत्तेचा शाेध घेऊन जप्ती करणे आहे. साक्षीदारांचा शाेध घेवून त्यांच्याकडे सखाेल तपास करणे आहे. सदर गुन्हयात आराेपीं विराेधात सक्षम पुरावे गाेळा करुन न्यायालयात वेळेत दाेषाराेपपत्र दाखल करणे असल्याने आराेपींना न्यायालयीन काेठडी मिळावी अशी मागणी पाेलीसांकडून करण्यात आली. याबाबत पुढील तपास पाेलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहे.

BITCOIN Fraud case two accused now Magistrate custody JMFC court order

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात