पंजाब सरकारचा मोठा निर्णय : कितीही वेळा निवडणूक जिंकली, तरी आमदारकीचे पेन्शन एकाच टर्मचे मिळणार


पंजाबमध्ये आता आमदाराला फक्त एकदाच पेन्शन मिळेल, मग तो कितीही वेळा निवडणूक जिंकला असेल तरीही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सेवेच्या नावाखाली आमदार राजकारणात उतरतात, तेव्हा लाखोंची पेन्शन देणे समर्थनीय नाही, असे मान म्हणाले. केवळ आमदारच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही सुधारणा करण्यात येणार असल्याचे मान यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे मान म्हणाले.Big decision of Punjab government: No matter how many times you win the election, you will get MLA’s pension for the same term


वृत्तसंस्था

चंदिगड : पंजाबमध्ये आता आमदाराला फक्त एकदाच पेन्शन मिळेल, मग तो कितीही वेळा निवडणूक जिंकला असेल तरीही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सेवेच्या नावाखाली आमदार राजकारणात उतरतात, तेव्हा लाखोंची पेन्शन देणे समर्थनीय नाही, असे मान म्हणाले. केवळ आमदारच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही सुधारणा करण्यात येणार असल्याचे मान यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे मान म्हणाले.

आप सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा झटका काँग्रेस आणि अकाली दलाला बसला आहे. प्रकाशसिंग बादल, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशिवाय राजिंदर कौर भट्टल यांच्यासह अकाली दल आणि काँग्रेसचे दिग्गज नेते, ज्यांना अनेकवेळा आमदार झाल्यामुळे लाखो रुपयांची पेन्शन मिळत होती.



सव्वा पाच लाखांपर्यंत मिळतेय पेन्शन

मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आमचे आमदार हात जोडून लोकांकडे मते मागतात. बरेच लोक सेवेबद्दल बोलतात आश्‍चर्य म्हणजे अनेक आमदारांना हरल्यानंतरही साडेतीन लाखांवरून दीड लाखांपर्यंत पेन्शन मिळते. तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडतो. खासदार आणि आमदार या दोन्ही पदांची पेन्शन घेणारेही अनेक आहेत.

आता आमदार 2 वेळा विजयी होवो वा 7 वेळा, त्यांना फक्त एकाच टर्मसाठी पेन्शन मिळेल. यासोबतच पेन्शनमधून बचत होणारे कोट्यवधी रुपये जनतेच्या हितासाठी खर्च केले जाणार आहेत. अनेक आमदारांचे फॅमिली पेन्शनही खूप जास्त आहे, तेही कमी केले जात आहे.

पंजाबवर 3 लाख कोटींचे कर्ज

पंजाबवर सुमारे 3 लाख कोटींचे कर्ज आहे. गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर खुद्द सीएम भगवंत मान यांनी ही गोष्ट मान्य केली. पंजाबची आर्थिक स्थिती पाहता त्यांनी केंद्राकडे 1 लाख कोटींचे पॅकेजही मागितले होते.

Big decision of Punjab government: No matter how many times you win the election, you will get MLA’s pension for the same term

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात