कोयना धरणातून १०५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी


प्रतिनिधी

सातारा : कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सायंकाळी पाच वाजता १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.Discharge of water from Koyna Dam at a speed of 1050 cusecs, alert issued to riverside villages

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या प्रतिसेकंद ४९३२५ क्युसेक इतकी आवक होत आहे. पावसाचा जोर आणि शिल्लक पाऊसकाळ पाहता धरण व्यवस्थापनाने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज पायथा वीजगृह कार्यान्वित करून पाणी नदीपात्रात सोडले आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे.



कोयना धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणातील पाणीसाठा आज सायंकाळी पाच वाजता ४०.६३ टीएमसी झाला आहे, तर धरणाची पाणी पातळी २०९५ फूट झाली आहे. बुधवारी दिवसभरात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ७० मिलीमीटर, नवजा येथे ७९ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे १३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Discharge of water from Koyna Dam at a speed of 1050 cusecs, alert issued to riverside villages

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात