पुण्यात आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन..


  • अकरा दिव्यांग जोडप्यानी बांधली रेशीमगाठ..

विशेष प्रतिनिधी

पुणे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा आणि अविस्मरणीय असा क्षण..आणि तो जर विशेष व्यक्तींचा असेल तर आणखी विशेष ठरतो .. आपल्या दिव्यांगांवर मात करत आयुष्याची गोडी चाखणाऱ्या या अकरा दिव्यांग जोडप्यांचा पुण्यात विशेष विवाह सोहळा पार नुकताचं पडला..Different marriage ceremony..

सनई चौघड्याचा नाद, बँडच्या तालावर वाजत-गाजत निघालेली वरात, रथामध्ये दिमाखात बसलेले नवरदेव अशा थाटामाटाच्या वातावरणात दिव्यांग अकरा जोडप्यांनी रेशीमगाठ बांधत नव्या आयुष्याला आज सुरुवात केली.

सक्षम पुणे महानगर आणि दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, वानवडी यांच्या पुढाकारातून दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात वानवडी येथील संस्थेच्या आवारात पार पडला.

 

दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, उद्योजक पुनीत बालन, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्र बोरकर, संघचालक रवींद्र वंजारवाडकर, सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, प्रांत सचिव महेश टांकसाळे, सहसचिव गहिनीनाथ नलावडे, सक्षम पुणे महानगर सचिव दत्तात्रय लखे आदी उपस्थित होते.

दारातील तुळशी वृंदावनापासून ते देवघर, स्वयंपाक घरातील सर्व भांडी, बाथरूममधील साहित्य, सोफा-बेड अशा बारीकसारीक प्रत्येक गरजेच्या वस्तू रुखवतात मांडण्यात आल्या होत्या. १२ जोडप्यांचे यावेळी संपूर्ण थाटामाटात लग्न करून देण्यात आले. पुनीत बालन यांनी सर्व नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आणि संयोजकांचे आभार मानले.

Different marriage ceremony..

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात