ट्विटरवर लवकरच करता येईल व्हिडिओ-ऑडिओ कॉल, एलन मस्क यांची घोषणा, नंबरची एक्सचेंज न करता बोलू शकाल


प्रतिनिधी

नवी दिल्ली : लवकरच युझर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नंबर शेअर न करता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करू शकतील. तसेच, 11 मे (गुरुवार) पासून एनक्रिप्टेड मेसेजिंगदेखील सुरू होईल, त्यानंतर दोन व्यक्ती एकमेकांशी संभाषण करू शकतील. कोणतीही तिसरी व्यक्ती ही संभाषणे पाहू शकणार नाही. कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी याबाबतची घोषणा केली. Twitter will soon be able to make video-audio calls, Elon Musk announced, without exchanging numbers

मस्क यांनी ट्विट केले की, ‘अ‍ॅपच्या नवीन व्हर्जनमध्ये, तुम्ही थ्रेडमधील कोणत्याही टिप्पणीला थेट DM म्हणजेच डायरेक्ट मेसेजमध्ये उत्तर देऊ शकाल आणि कोणत्याही इमोजीचा वापर करून प्रतिसाद देऊ शकाल.’



‘एनक्रिप्टेड DM V1.0’ 11 मे रोजी रिलीज होईल

एलन मस्क यांनी सांगितले की, उद्या म्हणजेच 11 मे रोजी ‘एनक्रिप्टेड DM V1.0’ रिलीज होईल. ही सेवा खूप वेगाने वाढेल. ‘माझ्या कानशिलावर बंदू लावलेली असेल तरीसुद्धा मी तुमचा डीएम पाहू शकणार नाही’, असे ते त्यांच्याच शैलीत म्हणाले. यानंतर डायरेक्ट मेसेज (DM) 2 लोकांपर्यंत मर्यादित असेल. इतर कोणीही ते पाहू शकणार नाही, खुद्द सीईओ एलन मस्कदेखील नाही.

नंबर एक्सचेंज न करता व्हिडिओ-ऑडिओ कॉल करू शकाल

याच ट्विटद्वारे मस्क पुढे म्हणाले, ‘लवकरच तुम्ही तुमच्या हँडलवरून कोणालाही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करू शकाल. या फीचरद्वारे तुम्ही तुमचा नंबर एक्सचेंज न करता जगात कुठेही लोकांशी बोलू शकाल. तथापि, मस्क यांनी व्हिडिओ-ऑडिओ कॉल्स एनक्रिप्ट केले जातील की नाही हे सांगितले नाही.

Twitter will soon be able to make video-audio calls, Elon Musk announced, without exchanging numbers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात