जे. पी. नड्डा, अमित शहा यांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री!!


 

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारण्याची अखेर तयारी दाखवली आहे. Devendra Fadnvais should take charge as Deputy CM of Maharashtra

देवेंद्र फडणवीस यांनी आधी राजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या ऐवजी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली होती. परंतु, आपण मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र शपथविधीच्या काही मिनिटे आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाचे स्वीकारण्याची सूचना केली. त्यांना व्यक्तिगत विनंती केली.या विनंतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील दुजोरा दिला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यायला मान्यता दिल्याची चर्चा आहे.

जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याचे ट्विट केले आहे.

Devendra Fadnvais should take charge as Deputy CM of Maharashtra

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती