प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही त्या हिंसाचाराचे निमित्त करून रझा अकादमीने अमरावतीत मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली. त्यामध्ये अनेक निर्दोष नागरिक जखमी झाले.Devendra Fadnavis visited the victims
दुसऱ्या दिवशी त्याची प्रतिक्रिया अमरावती शहरात उमटली. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या कार्यकर्त्यांना जे भोगायला लागले अंगावर शहारा आणणारे होते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
अमरावतीत निर्दोष नागरिकांना जे भोगावे लागले, ते अंगावर शहारे आणणारे होते. अमरावती येथे नुकत्याच झालेल्या हिंसाचारातील पीडितांची फडणवीसांनी आज तेथे जाऊन भेट घेतली. काही भागांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सहकारी उपस्थित होते, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
मसानगंज, हनुमान नगर आणि खोलापुरी गेट या भागात भेटी देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ज्यांचा काही दोष नाही, त्यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे, आरोप फडणवीस यांनी केला आहे
– जखमा आणि वेदना…
भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाले, त्यांची रेडिएंट फडणवीस यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि डॉक्टरांशी संवाद साधला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App