DEVENDRA FADANVIS : …आणि काही मात्र बायकांना टार्गेट करतात … ! किशोरी पेडणेकर अडचणीत देवेंद्र फडणवीसांची मदत-‘गोवा टू मुंबई लिफ्ट’…


अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे हा महाराष्ट्र धर्म हीच महाराष्ट्राची संस्कृती …ह्याची प्रचिती नुकतीच गोवा निवडणुकी पूर्वी आली .. सर्व राजकीय मतभेद बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांनी माणुसकी जपली ..


विशेष प्रतिनिधी

मुंबई:राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर शिवसेनेकडून तसेच राष्ट्रवादीकडूनही वारंवार अभद्र भाषेत टीका केली जाते. मात्र देवेंद्र फडणवीस नेहमीच आपली संस्कृती जपतात आता परत एकदा त्यांनी आपल्या कृतीमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन सर्वाना घडवलं आहे.किशोरी पेडणेकर यांनी नुकतेच अमृता फडणवीस यांना टार्गेट केले होते मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी फडणवीसांनी अडचणीत सापडलेल्या किशोरी पेडणेकर यांना तत्काळ मदत केली .DEVENDRA FADANVIS: … and some only target women …! Devendra Fadnavis’s help to kishori pednekar- ‘Goa to Mumbai lift’ …

गोव्यात विमान उपलब्ध नसल्यामुळे अडकलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना फ़डणवीसांनी आपल्या चार्टर्ड विमानात जागा देत लिफ्ट दिली आणि पुन्हा एकदा भाजप महिलांचा सन्मान करते हे दाखवून दिले .

 

विधानसभा निवडणुक 2022च्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस गोव्यात तळ ठोकून आहेत. प्रचारसभा, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान गोव्यात शिवसेनादेखील (Shiv Sena) मैदानात उतरली आहे, यानिमित्ताने किशोरी पेडणेकर गोव्यात पोहोचल्या होत्या, रविवारी घराघरात जाऊन त्यांनी प्रचार केला, याचदरम्यान त्यांना लतादीदींच्या निधनाची माहिती मिळाली.

निधनाची माहिती मिळताच किशोरी पेडणेकर तातडीने मुंबईसाठी रवाना झाल्या होत्या, यावेळी देवेंद्र फडणवीसदेखील गोव्यात असून ते चार्टर्ड विमानाने मुंबईला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी तातडीने फडणवीसांशी संपर्क साधत, लिफ्ट देण्याची विनंती केली, महापौर किशोरी पेडणेकरांची ही विनंती फडणवीसांनी मान्यही केली.

यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हेदेखील चार्टर प्लेननं मुंबईला आले. आणि त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकरही मुंबईला पोहोचल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नेत्या रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करत कौतुक केले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना नेटकर्यांनी महविकास आघाडीचा चांगलाच समाचार घेतला .

महाराष्ट्राची ही राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवली पाहिजे असं त्या म्हणाल्या. “अचानक लतादीदी यांच्या निधनाची बातमी मिळाली, मुंबईच्या महापौर किशोरीताईंना पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती, यावेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या चार्टर्ड प्लेनने त्यांना गोवा टू मुंबई लिफ्ट दिली. खरंतर महाराष्ट्राची ही राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवायला हवी, असं यावेळी रुपाली ताईंनी म्हटलं आहे.

किशोरी पेडणेकर आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात असलेला वाद सर्वश्रुत आहे. अनेक मुद्द्यांवरुन त्यांच्यात नेहमी शाब्दिक युद्ध होत असतात. नुकतंच मुंबईतील वाहतूक कोंडीवरुन अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेवर किशोरी पेडणेकरांनी टीका केली होती, पण हे सर्व वाद बाजूला ठेवत फडणवीसांनी किशोरी पेडणेकरांना केलेल्या मदतीबद्दल कौतुक होतं आहे.

 

DEVENDRA FADANVIS: … and some only target women …! Devendra Fadnavis’s help to kishori pednekar- ‘Goa to Mumbai lift’ …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात