आजचा दिवस फडणवीसांचा; काँग्रेसने मागितली राज्यसभेसाठी मदत; ठाकरे – पवारांनी मागितली ओबीसी आरक्षणासाठी मदत

ठाकरे – पवार आणि फडणवीस यांच्यात बैठक झाली. राज्यपालांनी काढलेल्या त्रुटींवर चर्चा झाली. त्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आणि तो अध्यादेश राज्यपालांकडे परत पाठविला. त्यानंतर राज्यपालांनी सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली. काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीसांकडे मदत मागितली म्हणून सकाळी नाराज झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुपारनंतर फडणवीस यांचीच मदत घ्यावी लागली…!! त्यामुळेच आजचा दिवस राजकीय दृष्ट्या फडणवीसांचा ठरला, असे म्हणावे लागेल.  Devendra Fadanavis political importance established today; congress + NCP + shiv sena demand help for rajya sabha election and OBC reservation


नाशिक : राजकीय दृष्ट्या आजचा दिवस माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ठरला…!! महाराष्ट्राच्या राजकारणात आज ते केंद्रस्थानी होते. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांची त्यांच्या “सागर” या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली, तर ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशात संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्याकडे मदत मागितली.

काँग्रेसच्या नेत्यांना राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवार रजनी पाटील यांच्या पराभवाची भीती वाटते आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्याला दगाफटका करतील. कारण रजनी पाटील यांची उमेदवारी शरद पवार यांना अमान्य असल्याचे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती करायला बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले फडणवीसांकडे गेले होते. फडणवीसांनी भाजपच्या कोअर कमिटीकडे बोट दाखवत नंतर निर्णय कळवतो असे त्यांना सांगितले.

काँग्रेसचे नेते फडणवीसांकडे गेले म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस नेत्यांवर नाराज झाल्याच्या बातम्या आल्या. पण या बातम्या येऊन हवेत विरतात ना विरतात तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांची मदत घेण्याची वेळ आली. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश ठाकरे पवार सरकारने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे पाठविला होता. परंतु राज्यपालांनी त्यात त्रुटी काढून तो अध्यादेश सरकारकडे परत पाठवला. त्यामुळे ठाकरे – पवार सरकार पेचात आले. त्यांना फडणवीस यांची मदत घेणे भाग पडले.

ठाकरे – पवार आणि फडणवीस यांच्यात बैठक झाली. राज्यपालांनी काढलेल्या त्रुटींवर चर्चा झाली. त्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आणि तो अध्यादेश राज्यपालांकडे परत पाठविला. त्यानंतर राज्यपालांनी सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली. काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीसांकडे मदत मागितली म्हणून सकाळी नाराज झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुपारनंतर फडणवीस यांचीच मदत घ्यावी लागली…!! त्यामुळेच आजचा दिवस राजकीय दृष्ट्या फडणवीसांचा ठरला, असे म्हणावे लागेल.

Devendra Fadanavis political importance established today; congress + NCP + shiv sena demand help for rajya sabha election and OBC reservation

महत्त्वाच्या बातम्या