जागतिक संकटातही भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत वेगवान; संयुक्त राष्ट्रांचा निर्वाळा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाचा आर्थिक दुष्परिणाम सगळ्या जगावर होत असताना अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. अशा परिस्थितीत भारताचा विकासदर 6.4 % टक्के राहील. गेल्या वर्षीच्या 8.8 % पेक्षा हा विकासदर कमी असला तरीही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने वर्तविला आहे. Despite the global crisis, the Indian economy is faster than the rest of the world

– सगळ्या जगातच महागाई वाढली

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि शक्यता अहवालात म्हटले आहे की, साथीच्या रोगामुळे नाजूक झालेली अर्थव्यवस्था युक्रेनमधील युद्धामुळे पुन्हा संकटात सापडली असून, जागतिक स्तरावर महागाईचा दबाव वाढला आहे. 

– अमेरिका, युरोप, चीनचे विकास दर घटले

अमेरिका, युरोपियन महासंघातील देश आणि चीनच्या विकासदरात घट करण्यात आली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था 2022 मध्ये 2.6 % आणि पुढील वर्षी 1.8 % नी वाढण्याची अपेक्षा आहे. चीनची अर्थव्यवस्था 2022 मध्ये 4.5 % आणि 2023 मध्ये 5.2 % वाढण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांमध्ये सरासरी 4.1 % नी विकासदर वाढेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

Despite the global crisis, the Indian economy is faster than the rest of the world

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!