GDP Growth : देशाच्या अर्थव्यवस्थेत मजबुती, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.४ टक्क्यांवर, ८ कोअर सेक्टरमध्ये विकास दरात वाढ

GDP Growth At 8.4 Percent In Second Quarter Growth Rate Increased In Eight Core Sectors

GDP Growth : या आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबरदरम्यान दुसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी) 8.4 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत जीडीपी 20.1 टक्के होता. त्याच वेळी, 2020-21 च्या त्याच दुसऱ्या तिमाहीत, GDP होता – 7.5 टक्के (वजा 7.5%) होता. सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. GDP Growth At 8.4 Percent In Second Quarter Growth Rate Increased In Eight Core Sectors


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : या आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबरदरम्यान दुसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी) 8.4 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत जीडीपी 20.1 टक्के होता. त्याच वेळी, 2020-21 च्या त्याच दुसऱ्या तिमाहीत, GDP होता – 7.5 टक्के (वजा 7.5%) होता. सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 35.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 32.97 लाख कोटी रुपये होता.

एनएसओने जारी केलेल्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची सकल मूल्यवर्धित (GVA) वाढ 5.5 टक्के होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत – ०.५ टक्के वाढ नोंदवली गेली. कृषी क्षेत्राची GVA वाढ 4.5 टक्के राहिली आहे जी मागील वर्षी याच तिमाहीत 3.0 टक्के होती.

7.5 टक्के GVA वाढ बांधकाम क्षेत्रात होती. गेल्या वर्षी एप्रिल-जुलै तिमाहीत तो उणे 7.2 टक्के होता. खाण क्षेत्राने 15.4 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता सेवांमध्ये 8.9 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 2.3 टक्के वाढ नोंदवली गेली होती. व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवांमध्ये ८.२ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांमध्ये 7.2 टक्के वाढ झाली आहे.

वित्तीय तूट लक्ष्याच्या 36.3 टक्के

एप्रिल-ऑक्टोबरदरम्यान वित्तीय तूट पूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या 36.3 टक्के होती. एकूण कर प्राप्ती 10.53 लाख कोटी रुपये आहे, तर एकूण खर्च 18.27 लाख कोटी रुपये आहे. सरकारने यावर्षी वित्तीय तूट 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

GDP Growth At 8.4 Percent In Second Quarter Growth Rate Increased In Eight Core Sectors

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात