चोर सोडून संन्याशाला सुळी, दिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या कथित आत्महत्येचा तपास करण्याची मागणी करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचा हा प्रकार असल्याची टीका करण्यात येत आहे.Crime registered against Narayan Rane and his son in Disha Salian case

दिशाची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली, असा आरोप नारायण राणे आणि नितेश राणे करत आहेत. त्यामुळे दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार मालवणी पोलिसांनी शनिवारी राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा नोंदवला आहे.दिशाची आई वसंती सालियन (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल – मे २०२० दरम्यान दोन करार रद्द होऊन झालेल्या तोट्यामुळे दिशा निराश होती. तसेच तिला वेळोवेळी याबाबत समजावले होते. त्यानंतर जाहिरातीच्या शूटिंगच्या कामानिमित्त ४ जून रोजी मित्र रोहनसोबत त्याच्या मालाड येथील निवासस्थानी गेले.

तेथेच ८ जून रोजी मित्र इंद्रनीलचा वाढदिवस साजरा केला. त्याच रात्री ८ वाजता दिशासोबत बोलणे झाले होते. त्यादरम्यान ती तणावात असल्याने तिला समजावले. त्याच रात्री दीडच्या सुमारास तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. यादरम्यान मालवणी पोलिसांनी व्यवस्थित तपास केला. तसेच आमचा कुणावरही संशय नसल्याचेही आम्ही सांगितले.

तरीदेखील १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, दिशावर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली, असे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या विधानाला नितेश राणे यांनी दुजोरा देऊन समाज माध्यमांवर दिशाची प्रतिष्ठा व चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये केली. त्यामुळे मुलीची बदनामी होत असून, आम्हाला सन्मानाने जगता येत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Crime registered against Narayan Rane and his son in Disha Salian case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती