लाल महालात लावणी : शूटिंग करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; मराठा महासंघाकडून महालाचे शुध्दीकरण!!


प्रतिनिधी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेली पुण्यातील ऐतिहासिक वास्तू पुण्यातील लाल महालात विनापरवाना लावणी नृत्याचे चित्रीकरण केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटील या तरुणीसह कुलदीप बापट आणि केदार अवसरे या तिघांविरुद्ध फरासखाना पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालात अशाप्रकारे लावणी नृत्य केल्याप्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाने तीव्र निषेध व्यक्त करून लाल महालाचे शुद्धीकरण केले आहे. Crime against three who shot; Purification of the palace by the Maratha Federation

शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या

वैष्णवी पाटील या तरुणीने पुण्यातील लाल महालात विनापरवाना लावणी नृत्याचे चित्रीकरण केले. त्यामुळे संभाजी ब्रिगेड संघटनेने वैष्णवी पाटीलसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाने आता लाल महालाचे शुद्धीकरण केले आहे. शौर्याची पवित्र जागा अपवित्र केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मासाहेबांनी शिवरायांना जिथे महिलांचा आदर करायला शिकवलं, त्याच लाल महालात लावणी नृत्य सादर केले. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असून नृत्य किंवा लावणी करण्याचे हे ठिकाण नाही. त्यामुळे याबाबत कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे.

वैष्णवीने मागितली माफी

यानंतर आता नृत्यांगना वैष्णवी पाटील हिने फेसबुक लाईव्ह करत केलेल्या कृत्याची माफी मागितली आहे. हा व्हिडिओ करताना माझ्या मनात शिवप्रेमींचा मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण ही माझी चूक असल्याचे म्हणत तिने आपला माफीनामा दिला आहे.

Crime against three who shot; Purification of the palace by the Maratha Federation

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात