नितीन गडकरींच्या नातवाची मुंज; पंतप्रधान मोदींकडून शुभाशीर्वाद!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातू निनाद याचा मौजीबंधन समारंभ आहे. या समारंभाची निमंत्रण पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गडकरी पती-पत्नींनी पाठवली आहे. त्या पत्रिकेचा स्वीकार करून पंतप्रधान मोदींनी गडकरींचा नातू निनाद याला खास पत्र पाठवून शुभाशीर्वाद दिले आहेत. Munj of Nitin Gadkari’s grandson; Congratulations from Prime Minister Modi

या खास पत्रात मोदी म्हणतात, की व्रतबंध हा बालकाच्या जीवनात गुरू-शिष्याचे नाते निर्माण करून बालकाला जीवनातल्या यशस्वितेची मार्गक्रमणा दाखवतो. भारतीय परंपरेतील सोळा संस्कार यांमधील उपनयन संस्कार फार महत्वाचा मानला जातो. मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनात यशस्वी होण्यासाठी जे उत्तम संस्कार लागतात, त्याची सुरुवात या उपनयन संस्कार आणि गुरु शिष्य परंपरेतून होते.

अनुशासन, विद्या प्राप्ति यातून बालक व्यक्तिगत जीवनात तर यशस्वी होतोच, परंतु कुटुंबासाठी आणि देशासाठी देखील आपल्या कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी तो उत्तम व्यक्ती आणि नागरिक बनतो. निनादला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी माझ्या भरभरून शुभेच्छा!!, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या खास पत्रात नमूद केले आहे.

Munj of Nitin Gadkari’s grandson; Congratulations from Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात