काँग्रेसने आंदोलनाचा आव आणला “सागर”वर; आंदोलक “बसले” जागेवर…!!


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या यांचे सरकारी निवासस्थान सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा मोठा आव आणला खरा पण प्रत्यक्षात काँग्रेस कार्यकर्ते सागर बंगल्यापर्यंत पोलिसांनी पोहोचलेले नाहीत त्यामुळे “आव आणला “सागर”वर; आंदोलक बसले जागेवर…!!” असे म्हणायची वेळ काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली.Congress pretends agitation on “Sagar”; The protesters “sat” in the place

त्याचे झाले असे की… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला, काँग्रेसची बदनामी केली, त्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या “सागर” बंगल्यावर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे सकाळपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जमाव जमला होता, मात्र प्रत्यक्षात काँग्रेसचे कार्यकर्ते “सागर” बंगल्यापर्यंत पोहचू शकले नाही. नाना पटोले यांना जागेवरच आंदोलन करावे लागले

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याआधी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. त्यांच्या सागर बंगल्यावर हल्लाबोल करण्याचा इशारा नानांनी दिला. त्याप्रमाणे सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी काँग्रेसने हे आंदोलन केले.

मात्र त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर काँग्रेसचे कार्यकर्ते “सागर” बंगल्यावर आले, तर त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. त्याप्रमाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारी केली होती. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांना “सागर” बंगल्याकडे येण्यास प्रतिबंध केला. त्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रतिबंध केला. त्यामुळे “सागर” बंगल्याकडे ना भाजपचे कार्यकर्ते पोहोचू शकले नाही, ना काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचू शकले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही जागेवरून हलू दिले नाही. त्यामुळे नाना पटोले यांना जागेवरच राहून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करावी लागली.

– आंदोलन करावे लागले स्थगित 

अखेर पोलिसांनी हे आंदोलन न करण्याची विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली. पटोले यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने आहे त्या ठिकाणीच रस्त्यातच आंदोलन सुरू केले. बराच वेळ आंदोलन केल्यानंतर अखेर हे आंदोलन थांबवत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले, मात्र, आजचे आंदोलन थांबले असले तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे पटोले यांनी सांगितले.

Congress pretends agitation on “Sagar”; The protesters “sat” in the place

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात