चीनमध्ये सरकारवर टीका करणाऱ्या उद्योगपतींची गळचेपी सुरुच, टीकाकार उद्योगपतीला १८ वर्षांची कैद


विशेष प्रतिनिधी

बीजिंग – सरकारी यंत्रणेविरुद्ध परखड भाष्य केल्याबद्दल एका उद्योगपतीला चीनमध्ये १८ वर्षांची कैद ठोठावण्यात आली. सून दावू असे त्यांचे नाव असून चीनच्या नामवंत अब्जाधीश उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश आहे.China govt. arrest and punished one more industrialist

दावू हे ६७ वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी मानवी हक्कांसह राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयांवर सडेतोड वक्तव्य केले आहे. त्यांना ३० लाख ११ हजार युआन इतका दंडही ठोठावण्यात आला.



दावू यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले. बहुतांश आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्याचवेळी ऑनलाइन संदेश टाकण्यासह काही चुका केल्याची कबुली त्यांनी दिली.
हेबेई या उत्तरेकडील प्रांतात दावू यांचा खासगी कृषी व्यवसाय आहे. याशिवाय मांसप्रक्रिया, पाळीव प्राण्यांचे खाद्य, शाळा, रुग्णालये अशा विविध क्षेत्रांतही त्यांनी व्यवसायाची व्याप्ती वाढविली आहे.

सरकारच्या ग्रामीणविषयक धोरणांवर त्यांनी पूर्वी टीका केली आहे. २००३ मध्ये अवैधरीत्या निधी उभारल्याबद्दल त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. मात्र कार्यकर्ते तसेच जनतेने जाहीरपणे उत्स्फूर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावरील खटला मागे घेण्यात आला होता.

China govt. arrest and punished one more industrialist

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात