चीनमध्ये वादळाच्या तडाख्याने झाली वाळूची तब्बल ३०० फुटी भिंत


वृत्तसंस्था

बीजिंग : चीनमधील हेनान प्रांतात गेल्या आठवड्याच मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर डुनहुआँग शहराला वाळूच्या वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे ३०० फूट उंचीची वाळूची महाकाय भिंतच तयार झाली होती. 300 km sand wall happened in china

गोबीच्या वाळवंटात हे वादळ तयार झाले. ‘एनबीसी’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार वाळूच्या वादळामुळे डुनहुआँग शहरात वाळूची ३०० फूट उंचीची जाडसर भिंतच तयार झाली होती.



ही महाकाय भिंत पुढे सरकतानाची आणि इमारती, रस्त्यांवरून जात असल्याची व्हिडिओ चित्रफित व्हायरल झाली आहे. या वादळामुळे दृश्यामानता २० फुटांपेक्षाही कमी झाल्याने वाहतुकीसाठी धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी शहरातील अनेक रस्ते बंद केले होते.

300 km sand wall happened in china

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात