चीनमध्ये धावली जगातील वेगवान चाके नसलेली ‘तरंगती’ रेल्वे


वृत्तसंस्था

बीजिंग : चीनने ६०० किलोमीटर प्रति तास वेगाने चालणारी मॅग्लेव्ह रेल्वेचे अनावरण केले. ही रेल्वे म्हणजे जमिनीवर चालणारे जगातील सर्वांत वेगवान वाहन आहे. क्विनडाओ या किनारी शहरात तिची बांधणी केली आहे. Maglave train runs in China

या रेल्वेत विद्युत चुंबकीय शक्तीचा वापर केलेला आहे. चाके नसलेली ही गाडी लोहमार्गावरून भरधाव जाऊ शकते. विद्युत चुंबकीय शक्तीमुळे ही रेल्वे अधांतरी धावत असल्याचे दिसते.यामुळे यात कोणतेही घर्षण होत नाही. हे तंत्रज्ञान चीन गेल्या दोन दशकांपासून मर्यादित स्वरूपात वापरत आहे. शांघायमध्ये शहरापासून विमानतळापर्यंत मॅग्लेव्ह रेल्वे चालविली जाते, मात्र अति वेगाचा वापर करणारा शहरातून दुसऱ्या जाणारी मॅग्लेव्ह मार्ग नाही. शांघाय आणि चेंगडू या शहरांमध्ये यावर संशोधन सुरू केले आहे.

ताशी ६०० किलो मीटर वेगाने ही रेल्वे बीजिंग ते शांघाय या शहरांमधील एक हजार किलोमीटर केवळ अडीच तासात कापते. एवढ्याच अंतरासाठी विमान प्रवासासाठी तीन तास लागतात तर उच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वे साडेपाच तासांत हे अंतर पार करू शकते.

Maglave train runs in China

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”