आसाम आणि मिझोराम सीमावादाला तब्बल शंभर वर्षांची संघर्षांची वादळी किनार

विशेष प्रतिनिधी

गुवाहटी – ईशान्येकडील सहा राज्ये आसामच्या सीमेवर असून त्यांच्यामध्येही सीमावाद आहे. आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावादाने सध्या सारा ईशान्य भारत अस्वस्थ आहे. मिझोराममधील समाजकंटकांनी केलेल्या गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू झाला.assam – mizo boundry dispute is 100 years old

सीमाप्रश्ना वरून दोन राज्यांतील हिंसाचार हा देशाला नवाच आहे. दोन राज्यातील या संघर्षाला फार मोठा इतिहास आहे. या वादाला तब्बल १०० वर्षांची संघर्षाची किनार आहे. त्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा.

१) ब्रिटिशांनी लुशाई हिल्स (मिझोराम) आणि कचहर हिल्स (आसाम) अशी हद्द आखली. याविषयीची अधिसूचना १८७३मध्ये प्रसिद्ध झाली होती. आसाम व मिझोराममध्ये १६५ किलोमीटरची सीमा आहे. सीमेवर मिझोरामच्या हद्दीतील ऐझॉल, कोलाशिब आणि मामीत हे जिल्हे आहेत तर आसामच्या भागात कचहर, करिमगंज आणि हैलाकंडी हे जिल्हे येतात.

२) १८७३च्या कायद्यानुसार सुमारे एक हजार ३१८ चौरस किलोमीटर एवढा भूभागावरील राखीव जंगलावर हक्काचा दावा मिझोरामने केला. १४८ वर्षांपूर्वीच्या या नियमाचे पालन करीत या जागेवरील हक्क सोडण्यास आसामने नकार दिला. तेव्हापासून आतापर्यंत हा सीमावाद सुटलेला नाही.

३) मिझोरामच्या नागरिकांनी बराक खोऱ्यातील आसामच्या तीन जिल्ह्यांत एक हजार ७७७-५८ हेक्टर जमिनीवर अवैध ताबा मिळविल्याचा आसाम सरकारचा दावा आहे.

४) गेल्या काही वर्षांत सीमावाद हा भौगोलिक न राहता त्याला वांशिक रंग आला आहे. आसामच्या सीमेवरील भागात मुख्यत्वे बंगाली नागरिकांची संख्या अधिक आहे. बंगाली लोक अनधिकृतपणे येथे राहत असून राज्याच्या जमिनीवर त्यांनी ताबा मिळविल्याचा मिझो नागरिकांचा आरोप असतो.

५) वाद सोडविण्यासाठी केंद्र सरकारने सीमा आयोग नेमावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये केली. सीमेवरील भाग हा ‘नो मॅन्स लँड’ असेल असा करार आसाम व मिझोरामने केला होता. या करारानेही वाद न सुटल्याने २०२० मध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेतला.

६) २०२० मध्ये वादग्रस्त सीमाभागातून मिझोरामने सुरक्षा दलांना परत बोलविले नाही. त्यामुळे आसामामध्ये् नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.३०६ रोखला.

assam – mizo boundry dispute is 100 years old

महत्त्वाच्या बातम्या