मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतल्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडले


प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील समुद्र किनाऱ्यावरच्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडण्यात येत आहे. त्यांच्याच बंगल्याशेजारी ठाकरे – पवार सरकारमधले शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष निकटवर्ती अनिल परब यांचाही बंगला आहे.Chief Minister Uddhav Thackeray’s PA Milind Narvekar’s illegal bungalow in Dapoli demolished

या दोन्ही बंगल्यांच्या बेकायदा बांधकामासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र पोलिसांपासून केंद्रीय गृहमंत्रालया पर्यंत तक्रारी दाखल केल्या होत्या. आता मिलिंद नार्वेकर यांच्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम जेसीबी लावून पाडण्यास सुरुवात झाली आहे.



दापोलीच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यावर हा बंगला आहे. महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांपासून ते केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंत तक्रारी दाखल झाल्यानंतर संबंधित बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडण्यात आपण यशस्वी ठरलो. आता पुढचा नंबर अनिल परब यांच्या बेकायदा बंगल्याचा आहे, असेही किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray’s PA Milind Narvekar’s illegal bungalow in Dapoli demolished

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात