विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या वाटेवर नेणारा, पायाभूत सुविधा उभारणीला चालना देणारा आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला चाप लावणारा असा सकारात्मक, चांगला आणि समतोल असल्याची भावना कर सल्लागार, सनदी लेखापाल, वकिल यांनी व्यक्त केली. Budget to curb corruption through digitization Analysis Session by Maharashtra Tax Practitioners Association
सर्वार्थाने महत्वपूर्ण असलेल्या या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्यासाठी आणि लाईव्ह अर्थसंकल्प ऐकण्यासाठी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन (एमटीपीए) व देशभरातील इतर महत्वाच्या कर सल्लागार संघटनांच्या वतीने शिवाजी रस्त्यावरील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सभागृहात विशेष सत्राचे आयोजन केले होते. ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने ५०० पेक्षाअधिक कर सल्लागार, सनदी लेखापाल सहभागी झाले होते.
‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, प्रकाश पटवर्धन, शरद सूर्यवंशी, व्ही. एन. जोशी, ए. एम. मुजुमदार, संतोष शर्मा, विधिज्ञ मिलिंद भोंडे, सीए ऋता चितळे, सीए अलोक मेहरा, ‘एमटीपीए’चे पदाधिकारी श्रीपाद बेदरकर, स्वप्नील शहा, अनुरुद्र चव्हाण, ऍड. प्रणव शेठ आदी उपस्थित होते. विदर्भ, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणाहून कर सल्लागार सहभागी झाले होते.
मनोज चितळीकर म्हणाले, “हा अर्थसंकल्प देशाला विकासाकडे नेणारा आहे. शेती क्षेत्रात २.३७ लाख कोटींची तरतूद ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी तरतूद आहे. शेतकऱ्यांना समर्पित करणारा हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. टेक्नोलॉजीचा उपयोग करून शेतकऱ्यांना मार्केट एक्सेस मिळण्यास मदत होईल. ६० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट्य भविष्यातील भारतासाठी उपयुक्त ठरेल.”
नरेंद्र सोनवणे म्हणाले, “लघु व माध्यम उद्योग, कृषी क्षेत्रासह शिक्षण आणि संशोधन यासाठी भरीव तरतूद केली आहे. सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, स्टार्टअपला चालना देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. करदात्यांसाठी मात्र विशेष काही केल्याचे दिसत नाही. जीएसटी परताव्यातील अपेक्षित बदल झालेले नाहीत. कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठीही चांगली तरतूद केल्याचे दिसते. तसेच शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असल्याने, तसेच शेतीसंबंधी कागदपत्रांचे डिजिटलायझेशन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना मिळेल.”
ऍड. मिलिंद भोंडे म्हणाले, “पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. सर्वच सामाजिक घटकांचा अंतर्भाव असलेला हा अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर देतानाच अर्थव्यवस्थेतील तूट कमी करण्यावरही लक्ष दिले आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी स्वतंत्र चॅनेल सुरु होणार असून, डिजिटल शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम प्रमाणे आता स्कुल फ्रॉम होम ही संकल्पना रुजू शकेल.”
ऋता चितळे ( विभागीय समिती सदस्य, आयसीएआय) म्हणाल्या “युवक, कृषी आणि लघु व माध्यम उद्योगांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि महिलांचे सक्षमीकरण यासाठी भरीव तरतूद दिसते. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. करदात्यांच्या पदरी निराशा असली, तरी एकंदरीत समतोल साधणारा अर्थसंकल्प सीतारामन यांनी सादर केला आहे.”
प्रकाश पटवर्धन ( माजी अध्यक्ष, एमटीपीए) म्हणाले की चांगल्या रीतीने अर्थसंकल्प मांडला आहे. ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ असे याचे वर्णन करता येईल. जीएसटी संकलनाच्या बाबतीत जाचक तरतुदी आणि अनावश्यक दंड यामुळे वाढ झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे मधुसंचय आणि शोषण यातील फरक समजून घ्यायला हवा. क्रिप्टो करन्सी परदेशात शिक्षण, व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यावरही भर दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App