सर्वसामान्य लोकांचे डोके चक्रावून टाकणाऱ्या घोषणा डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर असेल एलआयसीचा आयपीओ त्याचबरोबर एकाच उद्योगांना वेबसाईटवर परवानगी, पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल बँकिंग त्याचबरोबर व्हायब्रंट व्हिलेज एक्सप्रेस हायवे, क्रिप्टो करन्सीवर ३० टक्के कर, हरित विकासासाठी ग्रीन मॉल, जागतिक विद्यापीठांना प्रवेश, डिजिटल रुपया अशा खूप मोठ्या मोठ्या घोषणा सर्वसामान्य लोकांचे डोके चक्रावून टाकणाऱ्या घोषणा केंद्र सरकारने केलेले आहेत. Ordinary people’s head-spinning announcements Reaction of Neelam Gorhe

जागतिक बाजारपेठेमध्ये यासर्व गोष्टींच्या साठी काही काम करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असू शकतो. परंतु कार्बन उत्सर्जन थांबवणे, महिला सक्षमीकरण योजना, पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल बँकिंग, डिजिटल लिटरसीच्या मधून शाळांची व्यवस्था, पिंजाळ प्रकल्प असे काही अगदी थोडे मुद्दे जर का सोडले तर बाकीचे संपूर्णपणाने जे मुद्दे आहेत. ते ‘नाव मोठं लक्षण खोटं’ असं म्हणता येईल अशा प्रकारची भूमिका दिसते आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय बजेटवर शिवसेना उपनेत्या, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.

 

त्याची काही उदाहरणे सांगताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, पाहिले तर प्रत्यक्षामध्ये अन्नसाठा मोठा असला, तरी सुद्धा त्याचा उपयोग माता आणि बालकांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी किती केला जातो आणि कुपोषणावर ती त्याचा काही परिणाम का केला जात नाही हा प्रश्न पडतो.

त्या म्हणाल्या की, दुसरा मुद्दा असा की शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये विम्याच्या योजनेवरती काही लक्ष कोटी रुपये खर्च करून प्रचंड अपयश येऊनही तशाच स्वरूपाच्या मध्ये ती योजना चालवली जात आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही, कमीकमी प्रीमियम मिळत चालले आहे. यांच्याबद्दलच्या अनेक अहवाल आले आहे त्याची कुठलीही दखल घेतलेली आपल्याला दिसत नाही.

याचसोबत रेल्वेच्या योजना असतील त्यातील प्रगती स्पष्ट नाही. महत्त्वाचे म्हणजे विशेषता कोरोना काळामध्ये आणि आधी सेवा क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योग व्यवस्थेचे फार मोठ्या प्रमाणात लोक सामाविष्ट आहेत. गेल्या कोरोना काळामध्ये सेवा क्षेत्राला सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे. या सेवा क्षेत्रांमधल्या अनौपचारिक कामगारांच्या काही प्रश्नांना न्याय देणे ते बाजूलाच राहिले, असे त्यांनी नमूद केले.

त्याचबरोबर कामगार विरोधी कायदे पूर्णपणाने सगळीकडे भारतभर त्याची जबरदस्ती करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी तसेच कायदे करण्यात आले होते आणि ते कायदे शेवटी मागे घ्यावे लागले आहेत. शहरी भागामध्ये रोजगार हमी योजनेची लोकांची अपेक्षा होती. विशेषता उद्योजकांपैकी काही उद्योजक खूप श्रीमंत झालेले आहेत, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा दर्जा आणि श्रीमंतांची श्रीमंती यांच्या मधील तफावतीचा कामाच्या दर्जावर परिणाम होत आहे ती त्याच्यावर मार्ग म्हणून शहरी बेरोजगारांसाठी काही पावले उचलायला हवी होती. किंबहुना ‘वर्क फ्रॉम होम’ जे मोठ्या प्रमाणात केले जाते आहे. त्यासंदर्भातील उपकरणे हे स्वस्त कशी केली जातील हे पाहायला होते. त्याच्या ऐवजी वेगवेगळ्या पद्धतीने पंधरावी, वीस, पंचवीस वर्षाचा पुढची भूमिका मी घेतोय असं दाखवायचे आणि प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती या अर्थसंकल्पाची दिसून येते आहे, असे गोऱ्हे म्हणाल्या.

राज्याचा जीएसटीचा वाटा आहे तो देण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. ‘उलट आम्ही देतो’ अशा गर्वाने अनेक केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते बोलत असतात. जणू काही ते उपकार करत आहेत, खरंतर राज्यांचे पैसे घेऊन ते न देणे म्हणजे एक अत्यंत क्षुद्र प्रकारचे राजकारण करून महाराष्ट्राची कोंडी करायचा प्रयत्न सातत्याने केंद्र सरकारचा चाललेला दिसतो आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

Ordinary people’s head-spinning announcements Reaction of Neelam Gorhe

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात