भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, आधी न्यायालयीन कोठडी, मग पुन्हा पोलीस कोठडी, जामीन कधी होणार? वाचा सविस्तर…

BJP MLA Nitesh Rane will be remanded in police custody till February 4, first in judicial custody, then again in police custody

BJP MLA Nitesh Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सुपुत्र भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान हिंसक घटनेचे हे प्रकरण आहे. ज्यामध्ये नितेश राणेंवर शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.यापूर्वी २५ जानेवारी रोजी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. BJP MLA Nitesh Rane will be remanded in police custody till February 4, first in judicial custody, then again in police custody


प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सुपुत्र भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान हिंसक घटनेचे हे प्रकरण आहे. ज्यामध्ये नितेश राणेंवर शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.यापूर्वी २५ जानेवारी रोजी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आधी न्यायालयीन कोठडी, मग पुन्हा पोलीस कोठडी का मिळाली?

नितेश राणे यांना सुरुवातीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरही त्यांना नंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला. यामुळे आधी न्यायालयीन कोठडी मिळूनही पुन्हा त्यांना पोलीस कोठडी का मिळाली असा प्रश्न अनेकांना आहे. याबाबत सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यावर न्यायालयाने त्याला कुठे ठेवायचा असा प्रश्न होता. त्यावर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली; परंतु त्यानंतर न्यायालयाला राज्य सरकारकडून करण्यात येणारा युक्तिवाद ऐकणे क्रमप्राप्त होते. आधीच न्यायालयाने आरोपीला अटकेपासून दहा दिवसांचे संरक्षण दिले होते. तो कालावधी मंगळवारी संपला होता. त्यानंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्याचा अधिकार होता. त्यामुळे जर पोलिासांना तसा अधिकार असेल आणि आरोपी न्यायालयाच्या ताब्यात असेल तर पोलीस न्यायालयाकडे पोलीस कोठडी मिळण्याची मागणी करू शकतात. न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकला, त्यांना तपासाच्या दृष्टीने आरोपीला पोलीस कोठडी देणं योग्य वाटल्याने न्यायालयीन कोठडी मिळूनही नंतर पोलीस कोठडी देण्यात आली.”

नितेश राणे यांचा जामीन कधी होणार?

आमदार नितेश राणे यांना न्यायालीन कोठडी मिळाली असती तर त्यांचे वकील लगेच सिंधुदुर्ग सत्र न्यायालय किंवा दिवाणी न्यायालयात जामीनासाठी अर्ज करू शकले असते. त्यामुळे राणे यांना कदाचित आजच जामीनही मिळू शकला असता. या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश परबही पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यामुळे पोलीस समोरासमोर बसून चौकशी करण्याची शक्यता आहे. त्याचसाठी पोलीस कोठडीची मागणी केली जात होती. अखेर न्यायालयाने सरकरी वकिलांची बाजू ऐकून घेत नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. परंतु त्यांचा जामीन केव्हा होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

याबाबत न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी असल्याने त्यांना दोन दिवस तरी जामीन मिळणार नाही. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना कदाचित न्यायालयीन कोठडी मिळेल. त्यानंतर ते कोर्टात जामिनासाठी युक्तिवाद करू शकतात. तथापि, आरोपपत्र दाखल झाल्याशिवाय जामिनावर सोडू नये, असा युक्तिवाद पोलिसांना केला तर त्यांना जामिनात अडचणी येऊ शकतात. अर्थात ते सर्व पोलिसी तपासावर अवलंबून असेल.

BJP MLA Nitesh Rane will be remanded in police custody till February 4, first in judicial custody, then again in police custody

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात