आमदार मुक्ताताई टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप; दोन भाजप आमदारांच्या कर्तव्यनिष्ठेचा वस्तूपाठ


प्रतिनिधी

पिंपरी : आधी मुक्ताताई टिळक आणि आता लक्ष्मण जगताप या दोन आमदारांच्या निधनामुळे भाजपने दोन कर्तव्यदक्ष आमदार गमावल्याची भावना महाराष्ट्रातल्या जनमानसात आहे. भाजपला ज्यावेळी मतांची अत्यंत गरज होती, तेव्हा मुक्ताचा टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोन्ही आमदारांनी आपले दुर्धर कॅन्सरसारखे आजार बाजूला ठेवत मतदानाचे कर्तव्य बजावले आणि भाजपला अत्यंत महत्त्वाच्या अशा निर्णायक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. 2022 च्या डिसेंबर मध्ये मुक्ताताई टिळक यांचे निधन झाले, तर आज 3 जानेवारी 2023 रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी इहलोकीचा निरोप घेतला. या दोन्ही आमदारांनी केवळ भाजपच्या लोकप्रतिनिधींसाठी कर्तव्यनिष्ठेचा वस्तूपाठ घालून दिला असे नाही, तर सर्वपक्षीयांसाठीच ते आदर्श लोकप्रतिनिधी ठरले. BJP mla laxman jagtap passed away; mukta tilak and laxman jagtap, example of duty bound public representatives

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी त्यांचा लढा सुरु होता. पिंपरीच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

या आधी गेल्या आठवड्यात पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे देखील कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. या दोघांच्या जाण्याने भाजपसाठी मोठा धक्का बसला आहे.



लक्ष्मण जगताप हे 2014 पर्यंत अजित पवार यांचे विश्वासू नेते आणि नगरसेवक होते आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप मनसे पाठिंब्यावर निवडणूक लढली पण पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  भाजपकडून उमेदवारी मिळवत त्यांनी विजय मिळवला.  2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी पालिकेत भाजपला विजय मिळवून दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर, जगताप यांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षपही राहिले आणि पिंपरी-चिंचवडचे महापौरपदही भूषविले होते. त्यांची दोनवेळा महापौरपदी वर्णी लागली. त्यानंतर 2004 साली ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. या काळात ते राष्ट्रवादीतच होते.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रकृती चिंताजनक असतानाही विधान परिषदेसाठी भाजपसाठी मतदान केले होते. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे भाजप विशेष आभार मानले होते. 22 डिसेंबर रोजी मुक्ता टिळक यांचे निधन झाल, तर आज 3 जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

BJP mla laxman jagtap passed away; mukta tilak and laxman jagtap, example of duty bound public representatives

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात