शर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल करणाऱ्या प्रदीप गावडे यांना अटक, नोटीस न पाठवताच कारवाईचा भाजपाचा आरोप


हिंदू समाजाला सडके म्हणणाऱ्या शर्जील उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करणारे भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बांद्रा सायबर सेल पोलिसांनी प्रदीप गावडे यांना सकाळी पुण्यातून ताब्यात घेतले. गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.BJP accuses Pradip Gawde of taking action against Sharjeel Usmani without sending notice


विशेष प्रतिनिधी

पुणे : हिंदू समाजाला सडके म्हणणार्‍या शर्जील उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करणारे भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बांद्रा सायबर सेल पोलिसांनी प्रदीप गावडे यांना सकाळी पुण्यातून ताब्यात घेतले. गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू आमदार रोहीत पवार यांच्यावर ट्विटरवर टीका केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदीप गावडे यांनी अत्यंत अश्लील, द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्या 54 जणांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले होते.

त्या 54 जणांना पाठिंबा दर्शवणारे ट्विट राष्ट्रवादीचे मंत्री आव्हाड यांनी केले होते. तेव्हापासून गावडे यांना लक्ष्य करण्यात आले होते. प्रदीप गावडे कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर वकील म्हणून बाजूही मांडत आहेत,

गेल्या वर्षी गावडे यांनी दिलेल्या अर्जावरून चौकशी आयोगाने शरद पवार यांना समन्स बजावले होते व त्यांची साक्षही होणार होती. परंतू कोरोनामुळे ती पुढे होणार आहे.

गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. गावडे यांचा मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील सायबर शाखेतर्फे जबाब नोंदवण्यात येत आहे.

त्यांच्याविरोधात भादंवि कलम 295 अ, 500 आणि 505/2 कलमांतर्गत तसेच आयटी एक्ट 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेआहेत.माझी अटक हे राजकिय षडयंत्र आहे. मोठे लोक यात समाविष्ठ आहेत.

मला 421 ची नोटीस द्यायला हवी होती. पवार कुटुंबिय जर एवढं घाबरत असेल तर त्यांनी गोविंद बागेत गोट्या खेळाव्यात असे गावडे यांनी म्हटले आहे. गावडे यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले होते की, मी आठ ते दहा दिवसांपूर्वी 54 जणांवर गुन्हा दाखल केला.

त्याबाबतीत बरीच चर्चा झाली. मी ज्या 54 जणांवर गुन्हा दाखल केलाय त्यातील बºयाच जणांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेले आहे. काहींनी महिलांना बलात्काराच्या धमक्या दिलेल्या आहेत.

आपल्या पैकी ज्याला कुणाला त्याचे पुरावे हवे असतील त्यांनी मला वैयक्तिक भेटावे. मी तुम्हाला सर्व पुरावे देऊ शकतो. मी जेव्हा 54 जणांवर गुन्हा दाखल केला तेव्हा मला माहिती होतं, हेतूपरस्पर माझ्यावर काहीतरी कारवाई करण्यात येईल.

मी अशा कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. मी 54 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांवर कोणत्या प्रकारचं प्रेशर आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे.

ज्यादिवशी गुन्हा दाखल केला त्यादिवशी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझी तक्रार केली. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित ट्विट डिलिट केले.

माझ्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रार देण्यात आली आहे. तसेच पुणे आणि मुंबईत माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण माझे जे ट्विट आहेत ते आक्षेपार्ह नाहीत. घटनेने जे मला स्वातंत्र्य दिलेलं आहे. माझ्या दोन ट्विटवर आक्षेप घेण्यात आला आहे, असे गावडे यांनी म्हटले आहे.

गावडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोसीन शेख यांनी हिंदूंचा देव असलेल्या यमदेवाचा फोटो मॉर्फ करुन मोदींचा फोटो लावला होता. त्याबाबत माझे ट्विट होतं.

मी कायद्याचा विद्यार्थी आहे. अजमेरच्या दर्गाच्या वेबसाईटवर जी माहिती होती तिच माहिती मी दुसर्‍या ट्विटमध्ये दिली होती. त्यावरुन माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

BJP accuses Pradip Gawde of taking action against Sharjeel Usmani without sending notice

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात