पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेची नौटंकी, राज्य सरकारने कर कमी करावेत, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेना नौटंकी करत आहे. राज्य सरकारनेच कर कमी करावे, किंमती कमी होतील असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Shiv Sena against petrol price hike state government should reduce taxes Devendra Fadnavis


प्रतिनिधी

मुंबई : पेट्रोल दरवाढविरोधात शिवसेना नौटंकी करत आहे. राज्य सरकारनेच कर कमी करावे, किंमती कमी होतील असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याविषयी फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यापूर्वी राज्याचे टॅक्स कमी करावे. शिवसेनेने मोर्चा काढण्यापेक्षा टॅक्स कमी करावेत.आमचे सरकार असताना टॅक्स कमी करण्यात आले होते. दोन रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले होते. यामुळे राज्य सरकारने टॅक्स कमी करावे. तसेच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये

फडणवीस म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला भांडवल करून स्वत:चे राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न सर्वांकडून केला जात आहे. याच निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो तो ज्याची त्याची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय .

राम मंदिरासाठी निधी गोळा केला जातोय. राम मंदिरचे पैसे जनतेने द्यावे की सरकारने द्यावे, यावर सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला. मात्र शर्जील प्रकरणावर अग्रलेख यायला 4 दिवस लागतात. यावरुनच स्पष्ट होते की सरकार शर्जीलला पाठीशी घालत आहे.

आम्ही ज्यावेळी आंदोलन केले त्यानंतर सरकारला जाग आली आणि कारवाई करण्याचे सांगण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

Shiv Sena against petrol price hike state government should reduce taxes Devendra Fadnavis

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*