भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरुन सुरुवात, पंकजा मुंडेचा समावेश ; समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी


वृत्तसंस्था

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या भाजपचे नवनिर्वाचित मंत्र्यांची आजपासून जन आशीर्वाद यात्रा सोमवारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे विविध मतदारसंघात आपली जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. Bhagwat Karad’s Jan Ashirwad Yatra starts from Gopinath Fort, involving Pankaja Munde, pritam Munde

मंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरुन झाली आहे. यावेळी गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.केंद्रीय मंत्री भागवत कराड हे जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले. या वेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे सुद्धा उपस्थित होत्या. याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी पंकजा मुंडे यांनी समर्थकांची खरडपट्टी सुद्धा काढली मात्र, तरीही मुंडे समर्थकांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या. प्रचंड गदारोळात यात्रेला शेवटी सुरवात झाली. पंकजा मुंडे यांनी जन आशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.

Bhagwat Karad’s Jan Ashirwad Yatra starts from Gopinath Fort, involving Pankaja Munde, pritam Munde

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था