विशेष प्रतिनिधी
पुणे: शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत, मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या देशातील मुलं देखील तानाजी मालुसरे होऊ शकतील, शिवाजी होऊ शकतील, असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. Shivaji Maharaj is the pride of the country, Governor Bhagat Singh Koshyari visited Sinhagad
कोश्यारी यांनी आज पुण्यातील सिंहगडाला भेट दिली. स्थानिक महिलांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने ओवाळून स्वागत केले. ते पुढं म्हणाले की, मी तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांविषयी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, जेवढं तुम्ही देखील वाचलं नसेल.
भारतात छत्रपती शिवाजी महाराज एका नव्या अवताराच्या रुपात आले. मोगल साम्राज्याचा अंत करण्यात आणि भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांनी ज्या बुद्धी, युक्ती आणि शक्तीचा वापर केला आणि राज्य केलं, त्याद्वारे एक प्रकारे एक नवी चेतना देशात जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत. जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more