प्रतिनिधी
पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी – भाजप उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर असताना चौथ्या फेरीत भगीरथ भालकेंनी आघाडी घेतली आहे.bhagirath bhalke leading, samadhan awatade trailling in pandharpur
चौथ्या फेरीत भगीरथ भालकेंना ११९४१ मते मिळालीत. तर समाधान आवताडे ११३०३ मते मिळाली आहेत.भगीरथ भालकेंना वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळाल्याचे मानले जाते.
एकूण २ लाख ३२ हजार मतदान झाले आहे. त्यामुळे चौथ्या फेरीनंतरही चित्र स्थिर राहील हे सांगणे कठीण आहे. दोन्ही उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर जाताना दिसत आहे.
पंढरपूर शहर आणि मंगळवेढा शहर येथील मतमोजणीचे मोठे आकडे अजून समोर यायचे आहेत. ज्यात दोन्ही उमेदवारांची खऱ्या अर्थाने परीक्षा होणार आहे. पंढरपूर शहरात भाजप – परिचारक परिवाराचे वर्चस्व आहे.
मंगळवेढ्यात भालके परिवाराला मोठा पाठिंबा असल्याचे मानले जाते. दोन्ही शहरांमधील मतदान कोणाच्या पारड्यात किती प्रमाणात जाते, यावर भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांचे भवितव्य अवलंबून आहे. शैला गोडसे यांची बंडखोरी अजून तरी भालकेंसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसलेली नाही
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App