सोनू सूदच्या ट्विटनंतर चीन जागेवर आला, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर रोखले नसल्याचा केला दावा


भारतामध्ये सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. यामुळे प्रसिध्द अभिनेता सोनू सूद याने शंभर ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मागविले होते. मात्र, चीनने त्यामध्ये अडथळे आणले. सोनू सूदने याबाबत ट्विट केल्यावर चीन जागेवर आला आणि आपण ऑक्सिजन अडविला नसल्याचे सांगितले. China wakes up after Sonu Sood’s tweet, claiming oxygen concentrator not stopped


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. यामुळे प्रसिध्द अभिनेता सोनू सूद याने शंभर ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मागविले होते. मात्र, चीनने त्यामध्ये अडथळे आणले. सोनू सूदने याबाबत ट्विट केल्यावर चीन जागेवर आला आणि आपण ऑक्सिजन अडविला नसल्याचे सांगितले.

सोनू सूदने भारतातील ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय म्हणून १०० कॉन्संट्रेटर मागविले होते. मात्र, चीनने त्यामध्ये अडथळा आणला. सोनूने याबाबत ट्विट करून म्हटले की चीनकडून वैद्यकीय मदतीमध्य अडथळा आणला जात आहे. यावर चीनचे भारतातील राजदूत सून विडॉँग यांनी ट्विट करून म्हटले की चीन भारताला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.



चीनकडून भारताला येणारी विमानसेवा सुरलित सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यात चीनमधून भारतात ६१ विमाने आली आहेत. कोणतीही समस्या असेल तर आम्ही मदत करण्यास तयार आहोत.

अभिनेता सोनू सूद याने कोरोना काळात मदतीचे उदाहरण प्रस्थापित केले आहे. सुरूवातीच्या टप्यात विविध शहरांतून आपल्या गावी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी सोनूने वाहतुकीची व्यवस्था केली. अनेकांच्या वैद्यकीय सेवेचा खर्च केला. आत्ता देशात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा भासत असताना सोनू पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

China wakes up after Sonu Sood’s tweet, claiming oxygen concentrator not stopped

महत्वाच्या  बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात