महाराष्ट्र, दिल्लीचा अपवाद वगळता सर्वच राज्यांनी उभारले स्वतचे ऑक्सिजन प्लॅँट

देशात सध्या ऑ क्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. छत्तीसगडसारख्या राज्यांनीही आपले स्वत:चे ऑक्सिजन प्लॅँट उभारले आहेत. मात्र, महाराष्ट्रआणि दिल्लीसारख्या राज्यांना स्वत:ची क्षमता तयार करता आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.With the exception of Maharashtra and Delhi, all the states have set up their own oxygen plants


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात सध्या ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. छत्तीसगडसारख्या राज्यांनीही आपले स्वत:चे ऑक्सिजन प्लॅँट उभारले आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांना स्वत:ची क्षमता तयार करता आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रआणि दिल्लीमध्ये सध्या ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहेकी केवळ महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यांमध्येच समस्या आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाचा धोका समोर दिसत असतानाही या दोन राज्यांनी आपली ऑक्सिजनची क्षमता वाढविली नाही.

महाराष्ट्रात सध्या दररोज १७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता केवळ १२०० मेट्रिक टन आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या भीषण वातावरण निर्माण झाले आहे. हिच परिस्थिती दिल्लीमध्ये आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही.

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातच राज्यांना निर्देश दिले होते की त्यांनी आपली ऑक्सिजनची क्षमता वाढवायला हवी. त्यासाठी केंद्राकडून निधीही देण्यात आला होता. मात्र, या दोन राज्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसºया लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

With the exception of Maharashtra and Delhi, all the states have set up their own oxygen plants

महत्वाच्या  बातम्या