विशेष प्रतिनिधि
बारामती : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे.राजेश पांडे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला बारामती पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री बारामती-भिगवण रोडवरील अमृता लॉज मधून अटक करण्यात आली आहे.Baramati connection of bogus vaccination, fake vaccinator arrested in Mumbai
मुंबई येथील गुन्हयातील आरोपी राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे हा एका नामांकित हॉस्पिटल मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणुन नोकरीस होता. त्याने व त्याचे साथीदारांनी मिळुन भेसळ युक्त द्रव कोव्हीड १९ ची लस असल्याचे भासवुन लोकांचा कॅम्प आयोजीत केला होता.
सिल तुटलेल्या व्हॅक्सीन बाटल्या मधुन भेसळयुक्त लस देऊन लोकांची फसवणुक केली.लसीकरण केलेल्या लोकांना मुंबई मधील वेगवेगळया नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देवुन त्यांची फसवणुक केलेली आहे.
त्यामुळे पांडे अटक चुकविण्यासाठी,पोलीसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे शहर व परिसरात आल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी दिली. पांडे हा शहरातील अमृता लॉज या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी यावेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App