ट्विटरवरील सर्व अश्लिल मजकूर काढून टाका, राष्टीय महिला आयोगाची दिल्ली पोलीसांकडे मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटरकडे एका आठवड्याच्या आत सर्व प्रकारचा अश्लिल मजकूर काढून टाकण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे.Remove all obscene text on Twitter, National Women’s Commission demands from Delhi Police

महिला आयोगाच्या एका पॅनलने सांगितलं की, महिला आयोगाला ट्विटरवर अश्लिल मजकूर पोस्ट करणारे काही हँडल्स आढळून आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा सर्व अश्लिल मजकूर, फोटो, व्हिडिओ, सर्व काही एका आठवड्याच्या आत हटवावा असा इशारा महिला आयोगाने ट्विटरला दिला आहे.आयोगाने म्हटले आहे की, आधीही अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर आयोगाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती. भारतीय कायद्यांचं उल्लंघन करणारा, तसंच ट्विटरच्या नियमावलीचा भंग करणारा हा मजकूर ट्विटरवर उपलब्ध आहे हे माहित असूनही तो हटवण्यासाठी ट्विटरकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, ही गोष्ट महिला आयोगाला खटकणारी आहे.

अशा प्रकारचा मजकूर पोस्ट करणारे काही हँडल्स आयोगाने ट्विटरच्या निदर्शनास आणून दिले आहेत. अशा प्रकारच्या सर्व पोस्ट एका आठवड्यामध्ये हटवण्यास आयोगाने सांगितलं आहे. तर अशाय हँडल्सवर काय कारवाई झाली याची माहिती ट्विटरने आयोगाला १० दिवसात द्यावी असंही सांगण्यात आलं आहे.

याआधी दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या तक्रारीनंतर ट्विटरविरोधात कारवाई केली होती. दिल्ली पोलिसांनी लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि अश्लिल साहित्याच्या संदर्भात ट्विटरला नोटीस पाठवली होती.

ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, ट्विटर बालकांच्या शोषणाचं समर्थन करत नाही. ते ट्विटरच्या नियमावलीच्या विरोधात जाऊन ज्या हँडल्सवर अशा पोस्ट्स येत आहेत त्यांची माहिती मिळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी ट्विटर भारतीय कायदे आणि काही सेवाभावी संस्थांसोबत काम करेल.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संसदेच्या स्थायी समितीने फेसबुक आणि गुगलच्या अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी बैठक घेतली. सरकारने जारी केलेले नवे आयटी नियम आणि देशातील कायद्यांचे पालन करावे.

सेक्युरिटी आणि प्रायवसीच्या नियमांचे कठोरतेने पालन करावं, असं समितीने कंपन्यांना सांगितलं. आयटी नियमांवरून सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.

Remove all obscene text on Twitter, National Women’s Commission demands from Delhi Police

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण