टायपिंग मिस्टेक वगैरे काही नाही; उद्धव ठाकरेंचे सीएमओच्या ट्विटर हॅंडलवर “संभाजीनगर”च; काँग्रेसला पुन्हा डिवचले

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून शिवसेना – काँग्रेस आमनेसामने आल्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएमओच्या ट्विटर हॅंडलवरून पुन्हा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला आहे… काँग्रेस नेत्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुन्हा त्यांनाच डिवचले आहे. Nothing like typing mistakes; Uddhav Thackeray Continue Using Sambhajinagar on CMOs Twitter handle; Congress was ousted again


विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून शिवसेना – काँग्रेस आमनेसामने आल्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएमओच्या ट्विटर हॅंडलवरून पुन्हा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला आहे… काँग्रेस नेत्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुन्हा त्यांनाच डिवचले आहे.औरंगाबाद नव्हे, संभाजीनगरच ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचा संदेशच उद्धव ठाकरे यांनी या ट्विटरमधून दिला आहे. कालच जेव्हा संभाजीनगर विमानतळाचे ट्विट सीएमओच्या ट्विटवरून करण्यात आले, त्यानंतर लगेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महलूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरांची नामांतरे हा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही. मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हॅंडल हे शासकीय डॉक्युमेंट आहे. त्यावर औरंगाबादचा असा उल्लेख करता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांना सुनावले होते.

Nothing like typing mistakes; Uddhav Thackeray Continue Using Sambhajinagar on CMOs Twitter handle; Congress was ousted again

काँग्रेसचे दुसरे मंत्री अस्लम शेरखान यांनी तर सीएमओच्या ट्विटरवरील संभाजीनगर हा उल्लेख टायपिंग मिस्टेक असल्याची मखलाशी केली होती. परंतु, आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुंठेवारी नियमित करण्याचे आश्वासन पूर्ण केले, असे ट्विट करताना “संभाजीनगरवासीय” असाच केला आहे. एक प्रकारे त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*