ग्रामीण भागातील महिला भगिनींसाठी रोजगार निर्मितीचा प्रयत्न – बच्चू कडू


 

दरम्यान महिलाभगिनींना गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.Attempt to create employment for women sisters in rural areas – Bachchu Kadu


विशेष प्रतिनिधी

अमरावती : चांदूर बाजार तालुक्यात देऊरवाडा, जवळा शहापूर आदी गावांत आधुनिक शिलाई मशिनद्वारे कपडे शिवून तयार करण्याचे प्रशिक्षण उपक्रम व शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बच्चू कडू म्हणाले की , ग्रामीण भागात छोट्या छोट्या व्यवसायांचे जाळे उभारून महिलाभगिनींना रोजगार मिळवून देणे आवश्यक आहे.दरम्यान यासाठी गावोगाव शिवणकाम व इतरही विविध रोजगारक्षम कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी देऊरवाडा येथे सांगितले.



दरम्यान महिलाभगिनींना गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.तसेच देऊरवाडा येथे अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या ४७ व्यक्तींना पट्टेवाटपाचा कार्यक्रमही राज्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाला. दरम्यान यावेळी प्रत्येक गरजूला घर मिळवून देणे हे महाविकास आघाडी शासनाचे प्राधान्य आहे.

त्यामुळे अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याबरोबरच आवास योजनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी पं. स. सदस्य सुनीताताई झिंगरे, सरपंच ललिता गायगोले, उपसरपंच आरशिया अंजुम, दीपक भोंगाडे, श्री. मोहोड, साहेबराव निमकर, छत्रपती केदार, सुरेंद्र सोनार, शेर मोहम्मद, वृषाली आवारे, रवी पवार, संजय भलावी आदी उपस्थित होते.

Attempt to create employment for women sisters in rural areas – Bachchu Kadu

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात