जिल्हा बँक निवडणुकीत अजित पवार यांना धक्का, कट्टर विरोध केलेले प्रदीप कंद विजयी


गद्दार पराभूत करा असे आवाहन करत भाजपचे प्रदीप कंद यांना पाडण्यासाठी जंग जंग पछाडनाऱ्या अजित पवार यांना जिल्हा बँक निवडणुकीत धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद निवडून आले आहेत. Big jolt to Ajit Pawar in district Bank, Pradip Kand win, NCP candidate defeated


वृत्तसंस्था

पुणे – गद्दार पराभूत करा असे आवाहन करत भाजपचे प्रदीप कंद यांना पाडण्यासाठी जंग जंग पछाडनाऱ्या अजित पवार यांना जिल्हा बँक निवडणुकीत धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद निवडून आले आहेत.

कंद यांनी अजित पवार यांचे निकटवर्तीय सुरेश घुले यांचा पराभव केला. जिल्हा बँक अ गट मतदार संघात मुळशी, हवेलीत प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अ वर्ग गटात मुळशी आणि हवेली तालुक्यात प्रस्थापितांना जोरदार धक्का देत नवीन व तरुण संचालकांची बँकेच्या राजकारण एन्ट्री झाली


राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या, तर 7 जागासाठी आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते घेत विजय मिळविला. कलाटे यांना 17 मते मिळाली.

हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्केंना पराभवाची धूळ चारत विकास दांगट विजयी झाले आहेत. तब्बल २० वर्ष संचालक असलेल्या म्हस्के यांचा ११ मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. जो निवडून येईल तो उमेदवार आपला हे सूत्र राष्ट्रवादीने याठिकाणी लागू केले होते.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाठी सगळ्यात मोठा धक्का कंद यांच्या विजयाने मानला जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले कंद हे एकेकाळी अजित पवार यांचे खास मानले जात. मात्र राज्यात भाजपचे सरकार आल्यावर त्यांनी अजित पवार यांची साथ सोडली होती. त्यामुळे कंद यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावली होती.

Big jolt to Ajit Pawar in district Bank, Pradip Kand win, NCP candidate defeated

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*