साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिला दणका


राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर जगदीश सावंत यांची उपाध्क्षपदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते.Appointment of Saibaba Sansthan Board of Trustees, Aurangabad Bench of the High Court slams the state government


विशेष प्रतिनिधी

शिर्डी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साई बाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर जगदीश सावंत यांची उपाध्क्षपदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते.

मात्र, या विश्वस्त मंडळ नियुक्तीवरुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दणका दिलाय. न्यायालयाची परवानगी न घेताच विश्वस्त मंडळाने पदभार घेतले. त्यामुळे साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाला आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.



औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही.न्यायालयाच्या परवानगीनंतरच सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे.

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ

१)आशुतोष काळे- अध्यक्ष
२)जगदीश सावंत- उपाध्यक्ष
३)अनुराधा आदिक- सदस्य
४)सुहास आहेर- सदस्य
५)अविनाश दंडवते- सदस्य
६)सचिन गुजर- सदस्य
७)राहुल कणाल- सदस्य
८)सुरेश वाबळे- सदस्य
९)जयवंतराव जाधव- सदस्य
१०)महेंद्र शेळके- सदस्य
११)एकनाथ गोंदकर- सदस्य
१२)शिर्डी नगर पंचायत अध्यक्ष (शिवाजी गोंदकर)- सदस्य

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण होणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

Appointment of Saibaba Sansthan Board of Trustees, Aurangabad Bench of the High Court slams the state government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात